
लखनऊच्या एका न्यायालयाने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना २०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. वीर सावरकर यांच्यावरील वक्तव्याच्या सुनावणीदरम्यान ते न्यायालयात हजर राहिले नाहीत, त्यामुळे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध ही कारवाई केली आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी असा इशाराही दिला की, राहुल गांधी यांनी कोणत्याही परिस्थितीत १४ एप्रिल २०२५ रोजी न्यायालयात हजर राहावे.