Viral Video : अपघातातग्रस्त चिमुकल्याची स्थिती पाहिल्यानंतर विभागीय आयुक्तांनाही कोसळलं रडू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

UP accident

Viral Video : अपघातातग्रस्त चिमुकल्याची स्थिती पाहिल्यानंतर विभागीय आयुक्तांनाही कोसळलं रडू

लखनऊ : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी इथं बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एक चिमुकला गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान, या अपघातग्रस्त चिमुकल्याची आणि त्याच्या आईची लखनऊच्या विभागीय आयुक्तांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी त्या चिमुकल्याची स्थिती पाहून विभागीय आयुक्तांनाही हुंदका दाटून आला. या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. बुधवारी झालेल्या या अपघातात १० जण ठार तर ४१ जण जखमी झाले होते. (Lucknow Divisional Commissioner breaks down as she interacts with injured child in Lakhimpur Kheri accident)

लखनऊच्या विभागाीय आयुक्त डॉ. रोशन जेकब ज्या स्वतः एक आई आहेत. शासकीय विभागातील सर्वोच्च पदावर कार्यरत असताना संवेदनशील असलेल्या जेकब यांना या चिमुकल्याचं आणि त्याच्या दुःख बघवलं नाही. भेटीदरम्यान त्यांनी या दोघा मायलेकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपचारांना उशीर केल्यानं संबंधित अधिकाऱ्यांना आणि रुग्णालय़ाच्या स्टाफला त्यांनी चांगलचं खडसावलं. दरम्यान, डॉक्टरांना हाक मारताना विभागीय आयुक्त जेकब यांचा हुंदका दाटून आला. त्यानंतर आपल्या साडीच्या पदरानं त्या डोळे पुसताना दिसून आल्या.

हेही वाचा: Chhagan Bhujbal : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यानंतर भुजबळांचं स्पष्टीकरण; म्हणाले, देशाविरुध्द बोललो तर ती..

दरम्यान, लखिमपूर खेरीचे चीफ मेडिकल ऑफिसर (सीएमओ) यांनी सांगितलं की, या अपघातातील जखमींपैकी १२ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना सध्या ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आलं आहे. तर २९ जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डेहराडूनहून काह लोक लखनऊच्या दिशेने निघाली होती. यावेळी या बसची विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका मिनी ट्रकसोबत जोरदार धडक झाली.