

Police investigation underway after two sisters in Lucknow allegedly died by suicide following prolonged depression linked to their pet dog’s illness.
esakal
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन बहिणींनी केवळ त्यांचा पाळीव श्वान बराच काळ आजारी असल्याने व तो बरा होत नसल्याच्या नैराश्यातून फिनॉल पिऊन आत्महत्या केली. मृत मुलींच्या कुटुंबाने हा दावा केला आहे. घटनेच्या वेळी घरी कोणीही नसल्याची माहिती आहे. पोलिस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत. पोलिस तपासात असे दिसून आले आहे की दोन्ही बहिणी बऱ्याच काळापासून नैराश्याने ग्रस्त होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते.