esakal | Lucknow: शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तिकुनियामध्ये जनसागर
sakal

बोलून बातमी शोधा

lakhimpur kheri

लखनौ : शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तिकुनियामध्ये जनसागर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लखनौ : लखीमपूर खेरी हिंसाचारात मरण पावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तिकुनिया गावामध्ये आज सामूहिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते.

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासह तब्बल पाच राज्यांतील पन्नास हजार शेतकरी यावेळी उपस्थित होते. प्रियांका, राष्ट्रीय लोकदलाचे नेते जयंत चौधरी देखील हेही यावेळी उपस्थित होते, चौधरी यांनाही व्यासपीठावर जागा मिळाली नाही. कोणत्याही राजकीय नेत्याला व्यासपीठावर स्थान द्यायचे नाही असा निर्धारच शेतकरी नेत्यांनी केला होता.

हेही वाचा: लोणंद, खंडाळ्यात आंतरराज्य टोळीतील चौघांना अटक

उत्तरप्रदेश पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र आशिष यांची आज पुन्हा चौकशी केली. पोलिसांनी आशिष यांच्यासाठी चौदा दिवसांची कोठडी मागितली होती पण न्यायालयाने त्यांना केवळ तीन दिवसांची कोठडी ठोठावली.

दरम्यान, या हिंसाचाराचा सगळा तपशील राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासमोर सादर केला जाणार असून त्यासाठी काँग्रेस नेत्यांचे एक शिष्टमंडळ उद्या (ता.१३) रोजी राष्ट्रपतींची भेट घेईल. यात सदस्यीय शिष्टमंडळामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे, आदींचा समावेश असेल.

हेही वाचा: औरंगाबादेत बंधाऱ्यात कार बुडाली,एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

शेतकऱ्यांचा निर्धार

  • पंतप्रधानांच्या पुतळ्याचे १५ ऑक्टोबर रोजी दहन

  • देशभर १८ ऑक्टोबर रोजी रेल रोको आंदोलन

  • मृत शेतकऱ्यांचे अस्थिविसर्जन २४ ऑक्टोबर रोजी

  • पाच हुतात्मा शेतकऱ्यांचे स्मारक उभारणार

  • लखनौत २६ रोजी भव्य किसान महापंचायत होणार

आता कोठे रेड कार्पेट अटक झाली असून आरोपींना पुष्पगुच्छ देऊन चौकशीसाठी बोलावण्यात आले. मंत्र्यांच्या आशिर्वादाखाली पोलिस काय चौकशी करतील? त्या पितापुत्रांना अटक होत नाहीतोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील.

- राकेश टिकैत, शेतकरी नेते

loading image
go to top