esakal | लोणंद, खंडाळ्यात आंतरराज्य टोळीतील चौघांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

thief arrested

लोणंद, खंडाळ्यात आंतरराज्य टोळीतील चौघांना अटक

sakal_logo
By
- प्रवीण जाधव

सातारा : लोणंद व खंडाळा येथील औद्योगिक वसाहतीमधील कंपनीतून तांब्याच्या तारा चोरणारी आंतरराज्य टोळी लोणंद पोलिसांनी उघडकीस आणली आहे. या गुन्ह्यामध्ये चार जणांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा: Corona Update : राज्यातील रुग्ण आणि मृत्यूसंख्येत वाढ

शाबुद्दीन हनिफ अन्सारी (वय ५४, रा. आदेनगर, हडपसर, पुणे, मूळ रा. सुलतानापुरी, दिल्ली), शकील समी मोहम्मद चौधरी (वय ३८, रा. चिंचपाडा, ठाणे, मूळ रा. उत्तर प्रदेश), आजिम अब्दुलरहिम सलमानी (वय ३०, रा. गुजरात), नागेश जगन्नाथ चव्हाण (वय ३५, सध्या रा. वाघोली, पुणे, मूळ रा. दहिगाव, ता. कोरेगाव) अशी त्यांची नावे आहेत. सहा आॅक्टोबरला रात्री अनोळखी व्यक्तींनी लोणंद येथील स्पार्क ग्रीन एनर्जी प्रा. लि. या बंद कंपनीच्या सुरक्षा रक्षकांना मारहाण करून बांधून ठेवत दीड लाख रुपयांच्या तांब्याच्या तारा लंपास केल्या होत्या. त्याचप्रमाणे खंडाळा औद्योगिक वसाहतीमधील कंपनीतूनही तांब्याच्या तारांची चोरी झाली होती. औद्योगिक वसाहतीमधील गुन्ह्यांची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी तातडीने गुन्हा उघडकीस आणण्याचे निर्देश दिले होते.

हेही वाचा: "येत्या काळात महाविकास आघाडी सरकारला सळो की पळो करुन सोडणार"

त्यानुसार उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी घटनास्थळी भेट देत लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक विशाल वायकर यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सांगितले होते. त्यांनी व उपनिरीक्षक गणेश माने यांनी फुटेजच्या तपासणीच्या आधारे संशयित हे उत्तर प्रदेश, मुंबई व पुणे येथील असल्याचे निष्पन्न केले. त्यानंतरच्या तपासामध्ये संशयित हा शहापूर (ठाणे) येथे वावरत असल्याचे समोर आले. त्यानुसार लोणंद पोलिसांनी शहापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक उपासे व कर्मचाऱ्यांच्या मदतीने बोलेरो कारचा पाठलाग करून दोन संशयितांना अटक केली.

या दरम्यान झालेल्या झटापटीत शहापूर पोलिस ठाण्याचा एक कर्मचारीही जखमी झाला. दुसऱ्या पथकाने मुख्य संशयिताला हडपसर येथून अटक केली. या कारवाईत सहायक निरीक्षक विशाल वायकर, उपनिरीक्षक गणेश माने, सहायक फौजदार पाडवी, हवालदार अविनाश नलवडे, महेश सपकाळ, संतोष नाळे, श्रीनाथ कदम, अभिजित घनवट, विठ्ठल काळे, फैयाज शेख, केतन लाळगे, अविनाश शिंदे, गोविंद आंधळे हे सहभागी होते. सर्व तपास पथकाचे पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी अभिनंदन केले आहे.

loading image
go to top