Corona Outbreak : LPG सिलेंडर्सप्रमाणं आता Oxygen सिलेंडर्ससाठी लागल्या रांगा!

उत्तर प्रदेशातील हे भयानक वास्तव छायाचित्रांच्या माध्यमातून समोर आलं आहे.
queue for medical oxygen
queue for medical oxygenSource by ANI
Updated on

लखनऊ : एलपीजी अर्थात घरगुती स्वंयपाकाच्या गॅस सिलेंडरसाठी नागरिकांनी रांगा लावलेल्या आपण पाहिल्या असतील. मात्र, आता हेच नागरिक आपल्या नातेवाईकाचा जीव वाचवण्यासाठी ऑक्सिजन सिलेंडर्ससाठी रांगा लावताना पहायला मिळत आहेत. देशात झालेल्या कोरोनाच्या उद्रेकामुळं ही भीषण परिस्थिती ओढवली आहे. उत्तर प्रदेशातील हे भयानक वास्तव छायाचित्रांच्या माध्यमातून समोर आलं आहे.

देशात कोरोनाचा उद्रेक झाला असून ज्या राज्यांना या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्या राज्यांमध्ये ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजन सिलेंडर्स भरुन घेण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहेत. आपल्या पेशन्टसाठी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन उपलब्ध नसल्याने नातेवाईकांनी ऑक्सिजन भरुन देणाऱ्या मेडिकल ऑक्सिजन केंद्राबाहेर मोठे सिलेंडर्स घेऊन रांगा लावल्या आहेत.

queue for medical oxygen
रेमडेसिव्हीर, प्लाझ्मा थेरपीबाबत एम्सच्या संचालकांचं महत्वाचं विधान; म्हणाले...

दरम्यान, उत्तर प्रदेशातील रुग्णालये कोविडच्या रुग्णांनी भरुन गेली असून आता बेडही उपलब्ध नाहीत. त्यामुळे राजधानी लखनऊ शहरात बेडसाठी अनेक प्रयत्न करुनही तो मिळू न शकल्यानं ऑक्सिजन सिलेंडरसह रुग्णालयांचे उंबरे झिजवणाऱ्या एका ७० वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीला नुकताच आपला जीव गमवावा लागला. अशाच प्रकारे अनेक रुग्ण सध्या ऑक्सिजनअभावी मृत्यूशी झुंज देत आहेत.

सरकारी आकडे कमी, मृतांची संख्या जास्त

देशात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये कोरोनाचे सरकारी आकडे कमी दिसत असले तरी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या लपून राहिलेली नाही. कारण या राज्यांमधील जवळपास सर्वच मोठ्या शहरांमधील प्रमुख स्मशानभूमींमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठीही जागा उपलब्ध नसल्याचं नुकत्याच समोर आलेल्या छायाचित्रांवरुन दिसून आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com