रेमडेसिव्हीर, प्लाझ्मा थेरपीबाबत एम्सच्या संचालकांचं महत्वाचं विधान; म्हणाले...

औषधांचा रुग्णांवर उपचारांसाठी लवकर आणि उशीरा वापर करणं चुकीचं असल्याचा दावा
एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया.
एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया.Source by ANI
Updated on

नवी दिल्ली : प्रत्येक दिवशी देशात कोविड-१९ आजाराची परिस्थिती बिघडत चालली आहे. यामुळे देश सध्या आरोग्य सुविधांबाबत अनेक संकटाचा सामना करत आहे. बेड्स, ऑक्सिजन, औषधं आणि आरोग्याच्या पायाभूत सुविधांपैकी इतर गोष्टींची कमतरता जाणवत आहे. यापार्श्वभूमीवर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अर्थात एम्सचे (AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी काही महत्वाच्या टिपण्णी केल्या आहेत. यामध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणि प्लाझ्मा थेरपीबाबतही त्यांनी भाष्य केलं आहे.

डॉ. गुलेरिया म्हणाले, "गेल्या एका वर्षात कोविड-१९ च्या व्यवस्थापनादरम्यान आपण दोन गोष्टी शिकलो ते म्हणजे 'औषध देणं आणि वेळेवर औषधं देणं'. जर तुम्ही रुग्णाला औषध खूपच आधी किंवा उशीरा दिलत तर त्याचे गंभीर परिणाम होतात. औषधांचं कॉकटेल तर रुग्णाचा उपचारांच्या पहिल्याच दिवशी मृत्यू ओढवू शकतो आणि ते अधिकच धोकादायक ठरु शकतं."

देशात कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांसाठी प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. या रेमडेसिव्हीर औषधाबाबत डॉ. गुलेरिया म्हणाले, "हे समजून घेणं महत्वाचं आहे की, रेमडेसिव्हीर इंजेक्शन ही काही जादुची गोळी नव्हे जे मृत्यूचं प्रमाण कमी करेल. आपल्याकडे अँटिव्हायरल औषध नसल्याने रेमडेसिव्हीर वापरत आहोत. मात्र, एखाद्या व्यक्तीला लक्षणंच नसतील किंवा सौम्य लक्षणं असतील तर त्याला हे इंजेक्शन देऊन उपयोग नाही. तसेच रुग्णाला खूपच त्रास व्हायला लागल्यानंतर हे इंजेक्शन दिल्यावरही त्याचा काहीही उपयोग होणार नाही. उलट जे कोरोनाबाधित रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनवर आहेत. तसेच ज्या रुग्णांच्या छातीच्या एक्स-रेमध्ये आणि सीटीस्कॅनमध्ये काही संसर्ग दाखवला असेल तर अशा रुग्णांनाच रेमडेसिव्हीरचा डोस देणं गरजेचं आहे."

एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया.
कोरोनाचा कहर ! भारतातून येणाऱ्या विमानांना हाँगकाँगमध्ये बंदी

त्याचबरोबर प्लाझ्मा थेरपीबाबत बोलताना डॉ. गुलेरिया यांनी काही अभ्यासांचा उल्लेखही केला. ते म्हणाले, "कोरोनाबाधित रुग्णांच्या प्लाझ्माबाबत झालेल्या काही संशोधनातून असंही समोर आलंय की, प्लाझ्मा थेरपी कोविडच्या रुग्णांना बरं करण्यात मर्यादित काम करते. याचा खूप काही उपयोग होत नाही. कारण दोन टक्क्यांहून कमी कोरोना रुग्णांना Tocilizumab या औषधाची गरज आहे. मात्र, हे औषधही सध्या मोठ्या प्रमाणावर वापरलं जात आहे. अनेक लक्षणं असलेल्या आणि लक्षणं नसलेल्या रुग्णांना लक्षणं असलेल्या रुग्णाप्रमाणं औषधोपचार दिले जात आहेत."

एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया.
लॉकडाउनचा निर्णय राज्यांनी घ्यावा; केंद्राची भूमिका

आयसीएमआरच्या डेटानुसार, RT-PCR टेस्टमध्ये सध्याची कोरोनाची नवी रुपंही दिसून येत आहेत. RT-PCR चाचण्या ८० टक्के योग्य दाखवतात. पण त्यामुळे उर्वरित २० टक्के प्रकरणांकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही. जर सँपल व्यवस्थित घेतलं गेलं नाही तसेच जर चाचणी खूपच लवकर केली जेव्हा रुग्णामध्ये विषाणूचा व्हायरल लोड खूपच कमी असतो तेव्हा ही चाचणी निगेटिव्ह दिसते. त्यामुळे जर रुग्णाला लक्षणं असतील, त्याचे लॅब रिपोर्ट आले असतील, यामध्ये सीटी स्कॅन, छातीचा एक्स-रे काढण्याची गरज असेल तर याचे उपचार सुरु करणं गरजेचं ठरतं. अशा वेळी २४ तासांत पुन्हा चाचणी करणं गरजेचं असतं, असंही डॉ. गुलेरिया यांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com