
पंजाबमधील लुधियानात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जिथे एका निळ्या प्लास्टिकच्या ड्रममधून एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेह प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये गुंडाळलेला होता आणि मृताच्या गळ्याला आणि पायाला दोरी बांधण्यात आल्या होत्या. परिसरात तीव्र दुर्गंधी पसरताच स्थानिक लोकांनी पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.