लुफ्तान्साची उड्डाणे रद्द; प्रवाशांचा गोंधळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

lufthansa flight cancellation 700 passengers stranded at delhi airport seek refund

लुफ्तान्साची उड्डाणे रद्द; प्रवाशांचा गोंधळ

नवी दिल्ली : जर्मनीची विमान कंपनी लुफ्तान्सा एअरलाइन्सचे वैमानिक वेतनवाढीसाठी संपावर गेल्याने उड्डाणे रद्द झाल्याचे समजताच राजधानी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळावर प्रवाशांनी गोंधळ घातला. दिल्लीतून जाणारे दोन उड्डाणे स्थगित झाल्याने सुमारे ७०० प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. यावेळी दीडशेहून अधिक नागरिकांनी तिकिटाचे पैसे परत द्यावेत किंवा पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी केली.

जर्मनीच्या लुफ्तान्सा एअरलाईन्सच्या वैमानिक संघटनेने विविध मागण्यांवरून संपाची घोषणा केली होती. त्यामुळे गुरुवारी जगभरातील सुमारे ८०० उड्डाणे रद्द करण्यात आले. या संपामुळे दीड लाखांहून अधिक प्रवाशांना फटका सहन करावा लागला. आज पहाटे जर्मनीकडे रवाना होणारे लुफ्तान्साची दोन्ही उड्डाणे मध्यरात्री १२.१५ वाजता रद्द झाल्याचे समजताच इंदिरा गांधी विमानतळावर प्रवाशांनी प्रचंड गोंधळ घातला. त्यांनी पर्यायी व्यवस्था किंवा तिकीटाचे पैसे परत देण्याची मागणी केली. या गोंधळाची माहिती कळताच सीआयएसएफचे जवान आणि आयजीआय विमानतळ प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

जुलै महिन्यातच लुफ्तान्सा कंपनीचे लॉजिस्टिक आणि टिकिटिंग कर्मचारी एक दिवसांच्या संपावर गेले होते. त्यामुळे हजार उड्डाणे रद्द झाली होती. विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले रात्री बाराच्या सुमारास दीडशे हून अधिक प्रवासी विमानतळाच्या प्रस्थान प्रवेशद्वार एक आणि टर्मिनल तीनच्या समोर जमले. लुफ्तान्साचे फ्रँकफर्ट आणि म्युनिच येथील उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. फ्रँकफर्टला पहाटे २.५० वाजता तर म्युनिचला १.१० वाजता विमान जाणार होते. यात अनुक्रमे ३०० आणि ४०० प्रवासी जाणार होते.

संपकर्त्या वैमानिकांनी मागणी नाकारली

लुफ्तान्साचे वैमानिक अनेक महिन्यांपासून वेतनात वाढ करण्याची मागणी करत आहेत. यानुसार कंपनीने १८ महिन्यांच्या कालावधीत दोन टप्प्यांत मूळ वेतनात एकूण ९०० युरो (९०१.३५ डॉलर) पेक्षा अधिक वेतनवाढीचा प्रस्ताव मांडला होता. मात्र वैमानिकांनी प्रस्ताव नाकारला. नवीन वेतनश्रेणी आणि रजेच्या रचनेत बदल करण्याची मागणी करत आहेत.

विमान क्षेत्रात चाललंय काय?

हवाई प्रवास आणि विमान उद्योग केंद्रीत असलेली विमान सेवा आता कोरोनापूर्वीच्या काळात येत आहे. जगभरातील सर्वच देशात विमान सेवा सुरळीत होत असताना विमान उद्योगाला अडचणीत आणणाऱ्या घटना घडत आहेत. विमान कर्मचाऱ्यांकडून वेतनवाढीसाठी सुरू केलेले आंदोलन, तांत्रिक बिघाडाच्या घटना, अपुरा कर्मचारी वर्ग आणि त्यामुळे उड्डाणे रद्द होण्याचे वाढते प्रमाण, तिकीट दरात झालेली वाढ. हे प्रश्‍न विमान उद्योगांना भेडसावत आहेत.

अमेरिकेत एरोस्पेस परिषद

कोरोना काळानंतर विमान उद्योगातील बदलत्या स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी यूएस चेंबरच्या वतीने ग्लोबल एरोस्पेस समिटचे आयोजन करण्यात आले असून ही परिषद येत्या १४ आणि १५ सप्टेंबरला वॉशिंग्टन येथे होत आहे. या परिषदेत विमान उद्योग, अंतराळ आणि संरक्षण क्षेत्रातील नामांकित उद्योजक सहभगी होणार अाहेत. विमान उद्योगाचा अर्थव्यवस्था, व्यापार, पुरवठा साखळी, सायबर सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा, मनुष्यबळ विकास आणि अन्य घटकांवर कसा परिणाम होतो यावर भाष्य करणार आहेत.

Web Title: Lufthansa Flight Cancellation 700 Passengers Stranded At Delhi Airport Seek Refund

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..