
पुराव्यांची ओळख पटली आहे त्यामुळे आता कलबुर्गी यांच्या हत्येचे गुढ उकलणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.
Kalburgi Murder Case: कलबुर्गी हत्या प्रकरणात आरोपींना ओळखण्यात यश
सामाजिक कार्यकर्ते डाॅ एम.एम. कलबुर्गी (M.M. Kalburgi) हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना कलबुर्गी आणि त्यांच्या मुलीने ओळखलं आहे. अमित बद्दी, गणेश मिस्किन, प्रवीण चतूर, अमोल काळे आणि महाराष्ट्रातील वासुदेव सूर्यवंशी अशी पाच संशयितांची नावे आहेत. कलबुर्गी यांची ३० आॅगस्ट २०१५ रोजी धारवाडमध्ये (Dharwad) राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
हेही वाचा: Goa Sex Racket l मुंबईतील टीव्ही अभिनेत्रीसह तिघींची सुटका
मिळालेल्या माहितीनुसार, धारवाडमध्ये काल न्यायालयात या पाच संशयितांना हजर करण्यात आले.यावेळी कलबुर्गी यांच्या पत्नी उमादेवी आणि त्यांची मुलगी रुपदर्शी यांनी पुराव्यासहीत आरोपींची ओळख पटवली आहे. या ताज्या घडामोडींमुळे नरेंद्र दाभोळकर (Narendra Dabholkar) आणि गोविंद पानसरे (Govind Pansare) यांच्या हत्येचे गूढ उकलणार का असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे. पुराव्यांची ओळख पटली आहे त्यामुळे आता कलबुर्गी यांच्या हत्येचे गुढ उकलणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रातील दोन मोठ्या व्यक्तीमत्वाच्या हत्या झाल्या होत्या. यामध्ये डाॅ. नरेंद्र दाभोळकर आणि काॅम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकरांना शोधण्यास यश येणार का असा प्रश्नही उपस्थित होत आहे. कलबुर्गी,दाभोळकर आणि पानसरे यांची हत्या एकाच पध्दतीने म्हणजे सकाळच्यावेळी गोळ्या घालून करण्यात आली होती. कलबुर्गी यांच्या आरोपींची ओळख पटल्याने आता या दोघांच्याही मारेकऱ्यांचा शोध लागू शकतो अशी चर्चा होत आहे.
Web Title: M M Kalburgi Murder Case Identified Accused Karnataka Crime News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..