T20 WC: 'मारो मुझे मारो'वाल्या फॅनचा नवा Video झाला व्हायरल | IND vs PAK | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maro-Muze-Maro-Video-Fan

IND vs PAK: सामन्यानंतर तो धावत भरमैदानात आला अन्...

T20 WC: 'मारो मुझे मारो'वाल्या फॅनचा नवा Video झाला व्हायरल

IND vs PAK, T20 World Cup 2021: भारतीय संघाचा टी२० विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानने १० गडी राखून दणदणीत पराभव केला. पाकिस्तानच्या संघाने टी२० विश्वचषक स्पर्धेत आजपर्यंत १२ वेळा भारताकडून सपाटून मार खाल्ला होता. मात्र कालच्या सामन्यात पाकिस्तानने सव्याज परतफेड केली. विराट कोहलीने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत ५७ धावा केल्या आणि संघाला १५१ धावांपर्यंत पोहोचवले. हे आव्हान पाकिस्तानच्या संघाने एकही गडी बाद न होऊ देता सहज पार केलं. पाकिस्तानच्या ऐतिहासिक विजयानंतर मारो मुझे मारो या व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील तरूणाचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झालो.

हेही वाचा: INDvsPAK: शाहिन आफ्रिदी चमकला; रोहित, राहुल, विराटला केलं बाद

विविध वर्ल्ड कप सामन्यांमध्ये पाकिस्तान भारताकडून सातत्याने पराभूत होत होतं. त्यावेळी मोमीन सादिक या तरूणाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. "वक्त बदल दिया, जसबात बदल दिये... मारो मुझे मारो...", असे काही डायलॉग्स असलेला व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. त्यानंतर काल पाकिस्तान जिंकल्यानंतर काही वेळाने तो धावत मैदानावर आला आणि त्याने त्या मातीला आणि गवतावर डोकं टेकवलं. पाकिस्तानने आज भारताला पराभूत केल्याची आठवण आणि पाक फॅन्सचा आवाज पुढील २०० वर्षे या स्टेडियममध्ये ऐकू येईल, असंही तो म्हणाला. त्याचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.

पाहा व्हिडीओ-

हेही वाचा: "तुम्ही भारताचं नाक कापलं; आजच कर्णधार पदाचा राजीनामा द्या"

दरम्यान, भारताने प्रथम फलंदाजी करताना १५१ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या सलामीवीरांनीच सामना संपवला. कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या दोघांनीच १५२ धावांचे लक्ष्य गाठले. रिझवानने ५५ चेंडूत नाबाद ७९ धावा कुटल्या. तर बाबर आझमने ५२ चेंडूत नाबाद ६८ धावा करत त्याला सुयोग्य साथ दिली.

Web Title: Maaro Mujhe Maaro Guy Goes Bonkers After Pakistan Beat Team India By 10 Wickets Ind Vs Pak Vjb

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..