Madhya Pradesh: मध्य प्रदेशात दोन वर्षांत २२ नवीन वैद्यकीय महाविद्यालये; एमबीबीएसच्या १२ हजार जागा वाढणार

Madhya Pradesh Medical Colleges Expansion :मध्य प्रदेशात आगामी दोन वर्षांत २२ नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचे नियोजन आहे. विद्यमान महाविद्यालयांतील जागावाढीसह एमबीबीएसच्या जागा ६ हजार ५० वरून १८ हजार ५० पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे.
Madhya Pradesh plans 22 new medical colleges to expand MBBS seats.

Madhya Pradesh plans 22 new medical colleges to expand MBBS seats.

esakal

Updated on: 

भोपाळ : मध्य प्रदेशात वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सुविधांचा विस्तार करण्यासाठी आगामी दोन वर्षांत २२ नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या महाविद्यालयांसह सध्याच्या महाविद्यालयांमधील जागांमध्ये वाढ केल्यानंतर राज्यात एमबीबीएसच्या १२ हजारांहून अधिक नवीन जागा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या ३४ वरून ५६ आणि एमबीबीएसच्या जागांची संख्या ६ हजार ५० वरून १८ हजार ५० पर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Loading content, please wait...