

Jabalpur Laborers Accident
ESakal
मध्य प्रदेशातील जबलपूर येथे एक भीषण रस्ता अपघात घडला. वीस जण जखमी झाले. रस्त्याच्या कडेला जेवण करत असलेल्या वीस जणांना एका भरधाव वेगाने येणाऱ्या कारने चिरडले. या अपघातात दोन महिला कामगारांचा मृत्यू झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या कारचे अचानक नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. घटनास्थळी गोंधळ उडाला. रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी आणि पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.