

Nalkehda Car Swept Away in Flooded Stream
esakal
मध्य प्रदेशातील आगर-मालवा जिल्ह्यातील नलखेडा येथे मुसळधार पावसामुळे दुथडी भरून वाहणाऱ्या ओढ्यात भाविकांना घेऊन जाणारी कार वाहून गेल्याची हृदयद्रावक घटना घडली. या दुर्घटनेत कारमधील आठ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये तीन मुले, दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. हे भाविक प्रसिद्ध माँ बगलामुखी मंदिरात दर्शनासाठी नलखेडा येथे आले होते.