
Madhya Pradesh
esakal
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी अंडी पौष्टिक आहार म्हणून प्रसारित करण्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. CM यादव यांनी अंडी खाण्याऐवजी जनतेला गायीचे दूध पिण्याचा सल्ला दिला. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील शालेय मुलांच्या भोजनात अंडी समाविष्ट करण्याच्या जुन्या राजकीय वादात पुन्हा एकदा ठिणगी पडली आहे.
मुख्यमंत्री यादव इंदौर शहराजवळील हातोद येथील गोशाळेत झालेल्या ‘गोवर्धन पूजा’ कार्यक्रमात बोलत होते. या प्रसंगी त्यांनी आरोग्य आणि पौष्टिकतेसाठी गायीचे महत्त्व अधोरेखित केले. मुख्यमंत्री म्हणाले, “ज्यांच्या घरात गाय असते, त्या घरातील मुलांसह संपूर्ण कुटुंब निरोगी राहते. ही देवाची लीला आहे, असे ते म्हणाले.