

Madhya Pradesh Tourism
esakal
भारत देशाच्या इतिहासाच्या पानात नाव कोरली गेलेली अनेक ऐतिहासिक ठिकाणे आजही आहेत. ती स्थळे आपलं अस्तित्व टिकवून आहेत. भारतातील अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांनी पारतंत्र्यातील योद्ध्यांचा रक्तरंजित इतिहास जपून ठेवला आहे.
आज आपण मध्य प्रदेश राज्यातील एका अशा किल्ल्याबद्दल सांगणार आहोत. ज्या किल्ल्याला भेट दिल्याने तूमच्या शरीरात देशभक्ती पुन्हा जागृत होईल. तूम्ही मध्य प्रदेश दौऱ्यावर असाल किंवा दिवाळी सुट्टीत प्लॅनिंग करणार असाल तर या किल्ल्याला नक्की भेट द्या.