
Madhya Pradesh
sakal prime
MP CM Yadav Announces Bhavantar Scheme for Soybean Farmers :
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव हे नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य करत आहेत. म्हणूनच त्यांनी अनेक निर्णय हे शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊन घेतलेले दिसतात. आता मध्य प्रदेशमध्ये सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा एकदा भावांतर योजनेचा आधार मिळणार आहे.
मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी सागर जिल्ह्यातील जैसीनगर येथे सभा घेत असताना सोयाबीन पिकासाठी ही योजना लागू करण्याची घोषणा केली आहे. यावेळी बोलताना राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळतोय की नाही याकडे आमचे लक्ष असेल असे ते म्हणाले.