esakal | ज्योतिरादित्य शिंदेंची बंडखोरी की, हे काँग्रेसचं अपयश?
sakal

बोलून बातमी शोधा

madhya pradesh congress crisis raviraj gaikwad writes about jyotiraditya scindia

एकेकाळी राहुल गांधींच्या खांद्याला खांदा लावून काँग्रेस वाढवण्यासाठी मैदानात उतरलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसमधून राज्याची आणि देशाची सेवा करता येत नाही, असं सांगून पक्षातील सर्व जबाबदाऱ्यांचा राजीनामा दिलाय.

ज्योतिरादित्य शिंदेंची बंडखोरी की, हे काँग्रेसचं अपयश?

sakal_logo
By
रविराज गायकवाड

ज्योतिरादित्य शिंदे यांचं बंड, हा मध्य प्रदेश काँग्रेस नाही तर, राष्ट्रीय काँग्रेससाठी मोठा धक्का आहे. विश्वासू नेत्यांच्या फळीत वरच्या स्थानी असणारा एखादा नेता, अशी बंडखोरी करतो, याचे वेगवेगळे अर्थ निघतात. अर्थात ज्योतिरादित्यांचा निर्णय एका रात्रीत झालेला नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशभरात काँग्रेस पराभूत झाली असताना, 2014मध्ये ज्योतिरादित्य शिंदेंनी विजय मिळवला होता. त्यावेळी काँग्रेसला लोकसभेत विरोधीपक्ष नेते पद मिळालं नाही. पण, गट नेते म्हणून कोणाची नियुक्ती होणार याची उत्सुकता होती. त्या वेळी सिद्धरामय्या आणि ज्योतिरादित्य शिंदे, अशी नावं चर्चेत होती. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी ज्योतिरादित्य शिंदेंना नव्हे तर, सिद्धरामय्या यांना पसंती दिली. मध्य प्रदेशात मुख्यमंत्री निवडतानाही काँग्रेसने हीच चूक केली. एकेकाळी राहुल गांधींच्या खांद्याला खांदा लावून काँग्रेस वाढवण्यासाठी मैदानात उतरलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसमधून राज्याची आणि देशाची सेवा करता येत नाही, असं सांगून पक्षातील सर्व जबाबदाऱ्यांचा राजीनामा दिलाय. याला ज्योतिरादित्यांची बंडखोरी यापेक्षा काँग्रेसचा नाकर्तेपणा म्हणावा लागेल.

मध्य प्रदेशात पुन्हा राजकीय भूकंप; काँग्रेसचे 17 आमदार पळाले?

राहुल ब्रिगेड कुठं आहे?
राहुल गांधी, ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट, मिलिंद देवरा, जितीन प्रसाद, प्रिया दत्त, राजीव सातव, अलका लांबा, अशी नावं काँग्रेसमध्ये राहुल ब्रिगेडचे सदस्य म्हणून ओळखली जात होती. त्यात ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू मानले जात होते. 2009मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली पुन्हा यूपीएचे सरकार केंद्रात सत्तेवर आले होते. त्यानंतर काँग्रेसमध्येच नव्हे तर, देशात राहुल गांधी यांच्या राहुल ब्रिगेडची खूप चर्चा सुरू होती. देशात तरुण नेतृत्वाची पुढची फळी तयार करण्याच्या उद्देशाने राहुल गांधी यांनी तरुण नेत्यांची मोट बांधली होती. पण, दहा-बारा वर्षांत फासे असे काही फिरले की, राहुल गांधींची ही ब्रिगेड काँग्रेसला तारू तर शकली नाहीच. पण, त्यातले मोहरीही निखळू लागले. देशभरात काँग्रेसचा पराभव होत असताना गेल्या पाच वर्षांत ही राहुल ब्रिगेड कुठं होती, असा प्रश्न पडतो. यातल्या केवळ सचिन पायलट या एका नेत्यानेच राजस्थानात गावात गावात जाऊन काँग्रेसला संजीवनी देण्याचा प्रयत्न केला. सध्या ते राजस्थानचे उपमुख्यमंत्री आहेत. मिलिंद देवरा यांनी महाराष्ट्र, मुंबई तर सोडाच कुलाब्याच्या बाहेरही मजल मारता आली नाही.

मध्य प्रदेशात भाजपचे ऑपरेशन लोटस यशस्वी; कमलनाथांनी घेतले मंत्र्यांचे राजीनामे

काँग्रेसचा ज्येष्ठांवर विश्वास
मुळात वडील माधवराव शिंदे हे काँग्रेसचे निष्ठावंत. 30 सप्टेंबर 2001 रोजी उत्तर प्रदेशमधील मैनपुरी जिल्ह्यात झालेल्या विमान अपघातात त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला. त्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे राजकारणात आले. रिक्त झालेल्या उत्तर प्रदेशातील गुना लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनित्व त्यांनी केले. पोटनिवडणुकीत साडे चार लाख मतांनी ते विजयी झाले. माधवराव शिंदे राजीव गांधींचे विश्वासू तर, ज्योतिरादित्य राहुल गांधींचे, असे समीकरण झाले. 2014च्या लोकसभा निवडणुकीत देशभरात नरेंद्र मोदी यांची लाट होती. पण, मध्य प्रदेशात छिंदवाडामध्ये कमलनाथ आणि गुनाममध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांनी विजय मिळवून अक्षरशः वादळात दिवा लावला होता. त्याची पुनरावृत्ती ज्योतिरादित्य शिंदे यांना 2019मध्ये करता आली नाही. त्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे काहींसे अस्वस्थ झाले. मुळात लोकसभा निवडणुकीच्या आधी झालेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवल्यानंतर ज्योतिरादित्य यांनी मुख्यमंत्रिपदाची आस होती. पण, काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी अनुभवी कमलनाथ यांच्यावर विश्वास टाकला. तिथं ज्योतिरादित्य शिंदे यांचा अपेक्षाभंग झाला.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हे तर काँग्रेसचं अपयश
मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे, कमलनाथ आणि दिग्विजय सिंह असे काँग्रेसचे तीन गट आहे. हे गट असूनही राज्यात काँग्रेसला भाजपपेक्षा जास्त जागा मिळवता आल्या होत्या. पण, दैव देतं आणि कर्म नेतं, अशी अवस्था काँग्रेसची आहे. एका राज्यातील तीन नेत्यांना सांभाळणं, त्यांना शांत करणं, काँग्रेस नेत्यांना जमलं नाही. विशेषतः राहुल गांधी यांना त्यांच्याच फळीतील विश्वासू मित्राची मनधरणी करणं, शक्य चा ननाही. त्यामुळं ज्योतिरादित्यांची बंडखोरी याही पेक्षा काँग्रेसचं अपयश म्हणूनही याकडं पहावं लागेल.