esakal | मध्य प्रदेशात भाजपचे ऑपरेशन लोटस यशस्वी; कमलनाथांनी मंत्र्यांकडून मागवले राजीनामे
sakal

बोलून बातमी शोधा

Madhya Pradesh political dispute between jyotiraditya Scindia and Kamalnath

मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण गंभीर झाले असून काल मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सर्व मंत्र्यांचे राजीनामे मागवून घेतले आहेत. 16 मंत्र्यांनी कमलनाथ यांना राजीानामा दिला असून, त्यांनी तो स्विकारला आहे.

मध्य प्रदेशात भाजपचे ऑपरेशन लोटस यशस्वी; कमलनाथांनी मंत्र्यांकडून मागवले राजीनामे

sakal_logo
By
वृत्तसंस्था

भोपाळ : मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण गंभीर झाले असून काल मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सर्व मंत्र्यांचे राजीनामे मागवून घेतले आहेत. 16 मंत्र्यांनी कमलनाथ यांना राजीानामा दिला असून, त्यांनी तो स्विकारला आहे. तसेच मंत्रिमंडळ पुनर्रचनेसाठी कमलनाथ यांनी पुढील हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मध्यरात्री मंत्र्यांची बैठक झाली असून, या बैठकीत पुढील निर्णयांबाबत चर्चा झाली. 

मध्य प्रदेशात पुन्हा राजकीय भूकंप; काँग्रेसचे 17 आमदार पळाले?

काँग्रेसचे कमलनाथ व ज्योतिरादित्य शिंदे यांच्यातील वाद आता टोकाला गेला असून, ज्योतिरादित्य बंडाच्या भूमिकेत गेले आहेत. कर्नाटकातील १७ आमदार बंगळूरला गेले असल्याची माहिती काल समोर आली होती, यात ६ मंत्र्यांचांही समावेश आहे. तर ज्योतिरादित्य आज स्वतः दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी आहेत, जे नुकतेच घराबाहेर पडले असून कुठे जाणार आहेत. याबद्दल माहिती नाही. 

ज्योतिरादित्य भाजपसोबत जाणार का, भाजपच्या समर्थनाने ते मुख्यमंत्री होणार का, कमलनाथ सरकार पडणार का अशा अनेक राजकीय अंदांजांबाबत चर्चा होत आहे. मात्र, भाजपचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले आही की, त्यांना काँग्रेसचे आमदार पाडण्यात काहीही रस नाही. तर काँग्रेसमधील आपआपसांतील वादामुळे ही वेळ आल्याचे शिवराज यांनी सांगितले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मध्य प्रदेशात विधानसभेच्या २३० जागा आहेत, त्यापैकी १०७ जागांवर काँग्रेस आहे. मात्र ज्योतिरादित्य यांनी केलेल्या बंडामुळे व भाजपच्या ऑपरेशन लोटसमुळे पुढे काय होणार याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे.   

loading image