esakal | हद्दच झाली! मास्कशिवाय फिरणारा आमदार म्हणतो, 'मी बाजरीची भाकरी खातो, कोरोना कसा होईल?'
sakal

बोलून बातमी शोधा

congress mla baijnath kushawah

नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नसल्यानं तसंच बेजबाबदारपणामुळे कोरोनाच्या संक्रमणात वाढ होत आहे. एका बाजुला सरकार सातत्यानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करत असताना नेत्यांकडूनच नियम धाब्यावर बसवले जात आहेत.

हद्दच झाली! मास्कशिवाय फिरणारा आमदार म्हणतो, 'मी बाजरीची भाकरी खातो, कोरोना कसा होईल?'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

भोपाळ - देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नसल्यानं तसंच बेजबाबदारपणामुळे कोरोनाच्या संक्रमणात वाढ होत आहे. एका बाजुला सरकार सातत्यानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करत असताना नेत्यांकडूनच नियम धाब्यावर बसवले जात आहेत. याआधीही काही नेत्यांनी कोरोनाच्या संकटकाळात बेजबाबदारपणा केल्याची उदाहरणे बघायला मिळाली आहेत. आता मध्य प्रदेशात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असून काँग्रेस आमदार बैजनाथ कुशवाह हे मास्क न घालता फिरताना दिसत होते. याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी अजब असं वक्तव्य केलं आहे. 

मध्य प्रदेशातील काँग्रेस आमदार बैजनाथ कुशवाह यांनी म्हटलं की, मी बाजरीच्या चार भाकरी खातो. त्यामुळे मला कोरोना कसा होऊ शकतो? असा उलट प्रश्नही त्यांनी विचारला. कोरोनाच्या या संकटात मास्कशिवाय का फिरत आहात असं त्यांना विचारण्यात आलं होतं. तेव्हा कुशवाह म्हणाले की, बाजरीच्या भाकरी खाऊन इम्युनिटी पॉवर वाढते. 

हे वाचा - उत्तर प्रदेश सरकारचा ‘आत्मनिर्भर’ अर्थसंकल्प

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करणारे कुशवाह हे एकटेच नेते नाहीत. राज्याच्या विधानसभेबाहेर अनेक नेते मास्क न घालता फिरत होते. कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वेगाने वाढत असताना नेत्यांकडून असा बेजबाबदारपणा चिंतेची बाब आहे.

हे वाचा - देशात कोरोनाची आकडेवारी देतेय धोक्याचा इशारा; महाराष्ट्र, केरळमध्ये चिंता

महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातही कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण चिंता वाढवणारे आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात निर्बंध कडक करण्यात आले असून काही ठिकाणी रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांना सातत्यानं आवाहन केल्यानंतरही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नसल्यानं प्रशासनानेही आता कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.