लग्नातलं जेवण पडलं महागात, 200 हून अधिक जणांना जुलाब-उलट्या I Madhya Pradesh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Madhya Pradesh

देवास जिल्ह्यामध्ये एका विवाह सोहळ्यात भोजन केल्यानंतर सुमारे 200 जणांची प्रकृती बिघडलीय.

लग्नातलं जेवण पडलं महागात, 200 हून अधिक जणांना जुलाब-उलट्या

देवास (मध्य प्रदेश) : मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) देवास जिल्ह्यातील (Dewas district) गुराडियाभील गावामध्ये एका लग्न समारंभात 200 हून अधिक लोकांना अन्नातून विषबाधा झालीय. लग्नात शिळं किंवा दूषित अन्नपदार्थ खाल्ल्यानं पीडितांना अन्नातून विषबाधा झाल्याचा अंदाज आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. या घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागामध्ये (Health Department) खळबळ उडालीय.

दरम्यान, आरोग्य विभागानं तात्काळ घटनास्थळी पथक पाठवून तपासणी केली. तर, अधिकच प्रकृती बिघडलेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. ही घटना बरोठा क्षेत्रातील गुराडियाभील गावातील असून इथं रविवारी एका लग्नामध्ये शेकडो लोक सभागी झाले होते. दरम्यान, कार्यक्रमापूर्वी लग्नात आलेल्या पाहुण्यांनी भोजन केलं. त्यानंतर सर्व लोक आपापल्या कामात गुंतले.

हेही वाचा: ईद मुबारक! जगभरात कशी साजरी झाली ईद? पाहा सुंदर फोटो

रविवारी सायंकाळ होताच काही जणांना उलट्या आणि जुलाबाची तक्रार होऊ लागली. मात्र, १-२ लोकांवर गावाताच खासगी डॉक्टरांनी उपचार केले. त्यानंतर अचानक आजारी लोकांची संख्या वाढू लागली. अनेकांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. बघता बघता २०० जणांची प्रकृती बिघडली. त्यामुळं तिथं खळबळ उडाली. या घटनेची माहिती आरोग्य विभागाला दिली गेली. रविवारी आरोग्य विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि सर्वांचं परीक्षण केलं गेलं. सध्या काही जणांची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय.

Web Title: Madhya Pradesh Dewas Marriage Feast Turns Harmful For Guests Over 200 Suffer Food Poisoning

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top