Video: मंत्री म्हणाले, जास्त बोलला तर गोळी मारेन...

वृत्तसंस्था
Thursday, 22 October 2020

मध्य प्रदेश सरकारमधील भारतीय जनता पक्षाचे मंत्री बिसाहूलाल सिंह यांचा शिव्या देत असतानाच गोळ्या घालील असे म्हणतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार करण्याच्या पवित्र्यात आहे.

भोपाळ (मध्य प्रदेश): मध्य प्रदेश सरकारमधील भारतीय जनता पक्षाचे मंत्री बिसाहूलाल सिंह यांचा शिव्या देत असतानाच गोळ्या घालील असे म्हणतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार करण्याच्या पवित्र्यात आहे.

...म्हणून ग्रामस्थांनी मंत्र्यांवर फेकले शेण

बिसाहूलाल सिंह यांचा खासगी चर्चा किंवा बैठकीदरम्यानचा हा व्हिडिओ कोणीतरी गुपचूप मोबाईलमध्ये शूट केला आहे. व्हिडिओमध्ये बिसाहूलाल सिंह हे सर्रास शिव्या घालत खिशातून बंदूक काढताना दिसत आहेत. बंदूक उगारून जास्त बोलशील तर गोळी मारेन, अशी थेट धमकी देतानाही यात ऐकू येत आहे. या व्हिडिओची क्लिप काँग्रेसच्या हाती लागल्याने आता याविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपविरोधात तक्रार करण्याच्या पवित्र्यात आहे. या व्हिडिओची अद्याप शहानिशा झालेली नसली, तरी काँग्रेसकडून हा व्हिडिओ शेअर करण्यात येत आहे.

दरम्यान, बिसाहूलाल सिंह सध्या शिवराज सिंह सरकारमध्ये आहेत. शिवाय ते पोटनिवडणुकीसाठी उभे आहेत. अनुपपूरच्या जागेवरून ते भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: madhya pradesh eletion bjp candidate bisahulal singh video viral