...म्हणून ग्रामस्थांनी मंत्र्यांवर फेकले शेण

bihar election labor minister vijay kumar sinha angry villages throw dung
bihar election labor minister vijay kumar sinha angry villages throw dung

लखीसराय: बिहार विधानसभा निवडणूक २०२० च्या प्रचारासाठी मंत्री आल्याचे पाहिल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी त्यांच्यावर शेण फेकायला सुरवात केली. भारतीय जनता पक्षाते उमेदवार आणि बिहार सरकारचे कामगार संसाधन मंत्री विजयकुमार सिन्हा यांनी ग्रामस्थांचा राग पाहिल्यानंतर मागे फिरण्याचा निर्णय घेतला. मंत्र्यांवर शेण फेकण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विजयकुमार सिन्हा यांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. हलसीच्या तरहारी गावात मते मागण्यासाठी गेले होते. गावात प्रवेश करताच सिन्हा यांच्या विरोधात ग्रामस्थांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. ग्रामस्थांनी त्यांना घेरल्यानंतर मुर्दाबादच्या घोषणा देण्यास सुरवात केली. शिवाय, ग्रामस्थांनी त्यांच्यावर शेण फेकायला सुरुवात केली. ग्रामस्थांचा विरोध पाहिल्यानंतर सिन्हा माघारी फिरले.

दरम्यान, ग्रामस्थांना शांत करण्याचा सिन्हा यांनी प्रयत्न केला. पण, नागरिक त्यांच्यावर शेण फेकू लागले. यानंतर सिन्हा गावात थांबले नाहीत. विजयकुमार सिन्हा यांनी काहीही काम केलेले नाही, असे असताना हे कोणत्या तोंडाने मतं मागण्यासाठी आले? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. पण, सिन्हा यांनी हा विरोधकांचा कट असल्याचा आरोप केला आहे. जनता आमच्या सोबत आहे. जनता एनडीएची विकासकामे पाहत आहे. याच कारणामुळे विरोधक घाबरले आहेत, असेही विजयकुमार सिन्हा म्हणाले.

विजयकुमार सिन्हा म्हणाले, 'गावात विरोध दर्शवला जात आहे, त्या गावात मी सहा रस्ते बनवले आहेत. तरहारी गावातील 95 टक्के नागरिक आमच्या सोबत आहेत. केवळ ५ टक्केच लोक अशा प्रकारची कामे करत आहेत. पाठीमागून कोणीतरी शेण फेकले आहे, ते मी पाहिले नाही.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com