
Madhya Pradesh
esakal
मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळेच राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचे काम करताना दिसून येते. आताही मध्य प्रदेश सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात कोट्यावधी रूपये पोहोचवले आहेत.
मध्य प्रदेशमधील 8.84 लाख शेतकऱ्यांना दसऱ्याच्या निमित्तानेच दिवाळीचे गिफ्ट मिळाले आहे. ज्या शेतकऱ्यांची पिके अतिवृष्टी, कीड रोग किंवा पिवळा मोझेक यामुळे नष्ट झाली आहेत, अशा शेतकऱ्यांच्या खात्यात मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी मदतीची रक्कम पाठवली आहे.