
Madhya Pradesh
sakal prime
मध्यप्रदेश सरकार नेहमीच महिलांच्या प्रगती आणि उन्नतीसाठी प्रयत्नशील आहे. याचीच प्रचिती वेळोवेळी हे सरकार देत आहे. काल १२ सप्टेंबर रोजी महिलांसाठी एक नवी घोषणा मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी केली आहे.
मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी झाबुआ जिल्ह्यातील पेटलावद येथे राज्यातील १.२६ कोटींहून अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम ट्रान्सफर केली आहे. ही १५४१ कोटी रुपयांहून अधिक रक्कम आहे. ही रक्कम ‘लाडकी बहिण’ योजनेच्या २८व्या हप्त्याअंतर्गत देण्यात आली.
मुख्यमंत्री डॉ. यादव यांनी ५३.४८ लाख सामाजिक सुरक्षा पेन्शन लाभार्थ्यांना ३२०.८९ कोटी रुपये, ३१ लाखांहून अधिक बहिणींना एलपीजी सिलिंडर रिफिलिंगसाठी ४८ कोटी रुपये आणि बीपीएल कुटुंबातील दिव्यांग लाभार्थ्यांना सानुकूलित वाहने वितरित केली.