
शंकराचार्यांच्या मूर्तीसाठी 2 हजार कोटींचा करणार खर्च MP सरकार
मध्यप्रदेश (Madhya Pradesh) सरकारने 2000 कोटी रुपये खर्चून शंकराचार्यांची 108 फूट उंचीची मूर्ती (Shankaracharya Statue) बसवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. या सभेला महामंडलेश्वर आचार्य अवधेशानंद यांच्यासह अनेक मान्यवर संत उपस्थित होते. ओंकारेश्वर येथे उभारण्यात येणारा 108 फूट उंचीचा शंकराचार्य पुतळा, संग्रहालय आणि आंतरराष्ट्रीय अद्वैत वेदांत संस्था या सर्व गोष्टींसाठी हजारो कोटी रुपये खर्च करून हे काम होणार असल्याची चर्चा बैठकीत झाली आहे.
हेही वाचा: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप नेते राजधानीत
यापूर्वी गुजरातमध्ये 182 मीटर उंचीचा स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा बसवण्यात आला होता. त्याची किंमत तीन हजार कोटी रुपयांहून अधिक होती. मध्यप्रदेशातील 'स्टॅच्यू ऑफ वननेस'ची (Statue of Oneness) किंमत 2000 कोटींहून अधिक असेल. हा पुतळा 54 फूट उंच व्यासपीठावर बसवला जाणार आहे. हा प्रकल्प 2023 पर्यंत पूर्ण होईल. यातील महत्वाची बाब म्हणजे, 9 फेब्रुवारी 2017 रोजी एक संग्रहालय बांधण्याची घोषणा करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय अद्वैत वेदांत संस्थेअंतर्गत सात केंद्रं सुरू करण्यात येणार आहेत. वासुदेव कामथ हा पुतळा बांधणार असून, पुतळ्याची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे 280 मीटर असेल.
हेही वाचा: काशी विश्वनाथाच्या सेवेकऱ्यांना PM मोदींकडून खास भेट
दरम्यान, 2000 कोटींहून अधिक खर्च करून हा एकतेचा पुतळा उभारणे हे मध्य प्रदेश सरकारच्या प्राधान्यक्रमांपैकी एक आहे, तर दुसरीकडे मध्यप्रदेश सरकारवर मोठ्या प्रमाणात कर्जाचं ओझं आहे. मात्र विरोधक देखील सध्या ते गांभीर्यानं घेण्याच्या मनस्थितीत नाहीत.
Web Title: Madhya Pradesh Government 2000 Crore Will Be Spent For The Idol Of Shankaracharya Statue Of Oneness
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..