

Dhanush Healthcare Systems proposes a Rs 400 crore investment to expand mobile medical units, telemedicine and digital healthcare services in Madhya Pradesh.
esakal
मध्य प्रदेश: मध्य प्रदेशातील आरोग्यसेवा अधिक आधुनिक आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या दृष्टीने धनुष हेल्थकेअर सिस्टीम्सने राज्यात ४०० कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावित प्रकल्पातून सुमारे ५०० तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. इंदूर येथील ब्रिलियंट कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित ‘मध्य प्रदेश सेमीकंडक्टर समिट-२०२६’च्या पहिल्या दिवशी कंपनीच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याशी वन-टू-वन बैठक घेऊन हा प्रस्ताव सादर केला.