

Heritage Tourism
esakal
मध्य प्रदेशातील समृद्ध ऐतिहासिक वारसा आणि जुन्या वास्तूंचे जतन करण्यासोबतच राज्यातील पर्यटनाला व्यावसायिक गती देण्यासाठी मध्य प्रदेश सरकारच्या पर्यटन विभागाने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आणली आहे. 'लीजवर घेतलेल्या हेरिटेज मालमत्तांवर हेरिटेज हॉटेल स्थापनेसाठी भांडवली गुंतवणूक सबसिडी' (Capital Investment Subsidy for Establishment of Heritage Hotel) असे या योजनेचे नाव आहे.