

Madhya Pradesh Jobs, 85,000 Youth, 62 Mineral Inspectors
esakal
मध्य प्रदेश: सरकारने गेल्या वर्षभरात ८५ हजार तरुणांना रोजगार आणि शासकीय सेवेच्या संधी उपलब्ध करून दिल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी दिली. भोपाळ येथील मुख्यमंत्री निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात त्यांनी ६२ नवनियुक्त खनिज निरीक्षकांना नियुक्तीपत्रे प्रदान केली. या वेळी राज्यातील खनिज क्षेत्रातील महसूलवाढ आणि नव्या खाण प्रकल्पांची माहितीही देण्यात आली.