Madhya Pradesh Lok Sabha Election Result : मध्यप्रदेश : भाजपकडून काँग्रेस पूर्णपणे चितपट

लोकसभा निवडणुकीच्या निकालात अभेद्य बालेकिल्ला असलेल्या मध्य प्रदेशात भाजपने यंदा निर्भेळ व एकहाती यश मिळवून देशात या निवडणुकीत आपली वेगळी नोंद केली आहे.
mohan yadav and shivraj singh chauhan
mohan yadav and shivraj singh chauhansakal

लोकसभा निवडणुकीच्या निकालात अभेद्य बालेकिल्ला असलेल्या मध्य प्रदेशात भाजपने यंदा निर्भेळ व एकहाती यश मिळवून देशात या निवडणुकीत आपली वेगळी नोंद केली आहे. सर्वच्या सर्व २९ जागांवर भाजप आघाडीवर आहे. गेल्या निवडणुकीत कॉँग्रेसने छिंदवाड्याची एक जागा जिंकून किमान लाज राखली होती. यंदा तशी लाज राखण्याची सोयही यंदा भाजपने ठेवली नाही.

राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, विद्यमान मुख्यमंत्री मोहन यादव, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आदी नेत्यांच्या नेतृत्वाखालील भाजपने प्रचंड मोठे यश ‘मोदी गॅरंटी’, केंद्र व राज्यातील विविध योजनांचा परिणामकारक वापर करून मिळविले. तर माजी मुख्यमंत्री कमलनाथ व राष्ट्रीय सचिव दिग्विजयसिंह, प्रदेशाध्यक्ष अरूण यादव यांच्या नेतृत्वाखालील कॉँग्रेसला मध्य प्रदेशात जनतेने पुन्हा नाकारले आहे.

निवडणुकीचा इंदूर पॅटर्न

कॉँग्रेससह सर्व उमेदवारांच्या माघारीनंतर देशातील लोकसभेतील पहिला विजय भाजपने गुजरातमधील सूरतमध्ये नोंदवला होता. त्यानंतर मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये अर्ज मागे घेण्याच्या दिवशी कॉँग्रेस उमेदवाराने आपली उमेदवारी मागे घेऊन कॉँग्रेसला अडचणीत आणले होते. त्याच्या या कृतीमुळे या मतदारसंघात कॉँग्रेसचा उमेदवारच शिल्लक राहिला नाही. परिणामी भाजपचे येथील उमेदवार शंकर लालवानी सर्वात मोठा मताधिक्क्याचा विजय इथे साकारणार आहेत.

त्यांना आतापर्यंत १२ लाख आठ हजारांवर मते मिळाली असून ते देशातील सर्वात मोठे मताधिक्क्य मिळविण्याच्या तयारीत आहेत. यासोबतच इंदूर मतदारसंघ आणखी एक विक्रम करणार आहे. तो म्हणजे नोटाचा. इथे देशात सर्वाधिक नोटाची मते नोंदवली जाणार आहेत. ती सध्या दोन लाखांपर्यंत नोंदली गेली आहेत. आपल्या उमेदवाराने पक्षाला न सांगता अर्ज मागे घेतल्यानंतर पेचात सापडलेल्या कॉँग्रेसने इथे नोटाला मते देण्याचे आवाहन मतदारांना केले होते.

शिंवराजसिंह, शिंदेंचाही वाटा

प्रदेशातील भाजपच्या यशाचे श्रेय केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनाही द्यावे लागेल. ते स्वतः त्यांच्या गुना मतदारसंघातून मोठे मताधिक्‍य मिळवून पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिध्द केले आहे. ते २०१९ला पराभूत झाले होते. त्यामुळे यंदा त्यांनी अत्यंत काळजीने निवडणूक प्रचार मोहिम राबवून आपला विजय साकारला. कमलनाथ, राहुल गांधी यांच्यासोबतच्या मतभेदातून ज्योतिरादित्य शिंदे यांनी कॉँग्रेस सोडून आपल्या २२ आमदारांना घेऊन पक्ष सोडला होता.

त्यातूनच भाजपला हातातून सुटलेली सत्ता पुन्हा मिळाली होती. त्यांच्या आजच्या विजयाने शिवराजसिंह चौहान यांनी बळकट केलेला भाजप पुन्हा बळकट झाला आहे. शिवराजसिंह चौहान स्वतःही विदिशा या मतदारसंघातून मोठा विजय मिळवत आहेत. ते तब्ल पाच वेळा खासदार, सहा वेळा आमदार व चार वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. मध्यप्रदेशातील आजच्या भाजपच्या यशाचे ते खरे शिलेदार आहेत, हे नक्की.

कॉँग्रसने मान्य केला पराभव...

कॉँग्रसचे नेते कमलनाथ यांचे पुत्र व एकमेव खासदार नकुलनाथ आपल्या परंपरागत छिंदवाडा मतदारसंघातून पराभवाच्या छायेत होते. त्यामुळे कॉँग्रेसची उरलीसुरली आशाही संपुष्टात आली. तर आणखी एक ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह आपल्या राजगड मतदारसंघात पिछाडीवर होते. या मोठ्या नेत्यांच्या पराभवानंतर कमलनाथ यांनी पराभव मान्य केला आहे.

सहा महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने चौथ्यांदा विजय मिळवून आपले वर्चस्व सिध्द केले होतेच. तोच कल लोकसभा निवडणुकीतही दिसून आला. हिंदू महासभा, जनसंघ ते भाजप अशा मोठ्या हिंदू विचारधारेच्या प्रवासात मध्यप्रदेश सातत्याने भाजपला पाठिंबा दिला होता. आजच्या लोकसभेतील विजयाने पुन्हा एकदा भाजपने आपले वर्चस्व निर्माण केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com