Madhya Pradesh government has transferred 20 IAS officers
esakal
मध्यप्रदेश सरकारने राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेत मोठा बदल करत तब्बल २० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या निर्णयामुळे अनेक महत्त्वाच्या विभागांचे नेतृत्व बदलले असून अनेक जिल्ह्यांना नवे कलेक्टर मिळाले आहेत. नवीन मुख्य सचिव अशोक बर्नवाल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर झालेला हा पहिलाच मोठा प्रशासकीय फेरबदल आहे.