व्हिडीओसाठी 'त्या' ठिकाणी पोझ देणं पडलं महाग; २२ वर्षांच्या मुलाचा दुर्देवी शेवट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्हिडीओसाठी तिथे पोझ देणं पडलं महाग; २२ वर्षांच्या मुलाचं दुर्देव

व्हिडीओसाठी तिथे पोझ देणं पडलं महाग; २२ वर्षांच्या मुलाचं दुर्देव

sakal_logo
By
दीनानाथ परब

भोपाळ: सोशल मीडियासाठी (Social media) साहसी फोटो, व्हिडीओ बनवण्याची सध्याच्या युवकांमध्ये (Youth) एक क्रेझ दिसून येते. एका फोटो किंवा व्हिडीओसाठी आपण आपला जीव धोक्यात घालतोय, याची त्यांना कल्पना असते, पण तरीही हे तरुण अशा प्रकारचं वेड साहस करण्यासाठी धजावतात. आपल्या जीवाचं काही बरं-वाईट झालं, तर आई-वडिलांचं, कुटुंबीयांच काय होईल, याचा विचार ही मुलं करत नाहीत.

मध्य प्रदेशच्या होशांगाबाद जिल्ह्यात सोमवारी अशाच एका घटनेत २२ वर्षाच्या मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला. रेल्वे रुळावर व्हिडीओसाठी पोझ देत असताना ट्रेनची धडक लागून संजू चौरे या तरुणाचा मृत्यू झाला. इटारसी-नागपूर रेल्वे मार्गावर रविवारी ही घटना घडली. संजू पंजारा काला गावच रहिवाशी आहे.

हेही वाचा: युक्रेनच्या सीमेवर रशियन फौजा, रणगाडे, पुतिन हल्ल्याचा आदेश देणार?

"सोशल मीडियावर अपलोड करण्यासाठी संजू अन्य मुलांसोबत तिथे व्हिडीओ शूट करत होता. त्यावेळी संध्याकाळी ५.३० च्या सुमारास त्याला ट्रेनने धडक दिली. त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले" अशी माहिती पोलीस अधिकारी नागेश वर्मा यांनी दिली.

हेही वाचा: समीर वानखेडे इन अ‍ॅक्शन, नांदेडमधून जप्त केले १११ किलो ड्रग्ज

मित्राने शूट केलेल्या व्हिडीओमध्ये संजू चौरे रेल्वे रुळाच्या जवळ दिसत आहे. मालगाडी त्याच्या दिशेने येत होती. त्याने बाजूला व्हावे, यासाठी मोटरमन हॉर्न वाजवत होता. पण त्या दरम्यान संजूला ट्रेनची धडक बसली.

loading image
go to top