समीर वानखेडे इन अ‍ॅक्शन, नांदेडमधून जप्त केले १११ किलो ड्रग्ज | Sameer wankhede | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sameer Wankhede

समीर वानखेडे इन अ‍ॅक्शन, नांदेडमधून जप्त केले १११ किलो ड्रग्ज

मुंबई: व्यक्तीगत आयुष्यात समीर वानखेडे (Sameer wankhede) एकाबाजूला दररोज वेगवेगळ्या आरोपांचा सामना करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या नेतृत्वाखाली NCB ची धडक कारवाई सुरु आहे. NCB चे झोनल संचालक समीर वानखेडे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन एनसीबीने नांदेडमधून (Nanded) जप्त केलेल्या ड्रग्जबद्दलची माहिती दिली. नांदेडच्या कामठा परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. तिथून सुमारे 111 किलो ड्रग्ज (Drugs) बनवण्यासाठीचे केमिकल ​​जप्त करण्यात आले. ज्याचा वापर हेरॉईन ड्रग्ज बनवण्यासाठी केला जातो, अशी माहिती वानखेडे यांनी दिली.

छाप्यादरम्यान एनसीबीने नोट मोजण्याचे मशीन, 1.55 लाख रुपये रोख आणि 1.30 किलो अफू जप्त केले आहे. या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी एक मालक असून तो रोड ट्रान्सपोर्टमध्ये काम करायचा असे त्यांनी सांगितले. या कारवाईनंतर मध्यप्रदेशमध्येही एनसीबीची छापेमारी सुरू आहे.

हेही वाचा: 'शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी असं करायला नको होतं', खडसेंची प्रतिक्रिया

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे समीर वानखेडे सध्या चर्चेमध्ये आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी त्यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडे यांच्या धर्मावरुन तसेच त्यांच्या विश्वासहर्तेबद्दल नवाब मलिक दररोज पत्रकार परिषदा घेऊन आरोप करत आहेत. समीर वानखेडे यांच्या व्यक्तीगत आयुष्याबद्दलही त्यांनी अनेक खुलासे केले आहेत.

हेही वाचा: युक्रेनच्या सीमेवर रशियन फौजा, रणगाडे, पुतिन हल्ल्याचा आदेश देणार?

समीर वानखेडे यांची पहिली पत्नी मुस्लिम होती. त्यांचा निकाह झाला होता असे आरोप मलिकांनी केले आहेत. आपण मुस्लिम नसून हिंदू आहोत, असे वानखेडे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. समीर वानखेडे हिंदू धर्माचे पालन करतात अभिनेत्री क्रांती रेडकरबरोबर त्यांनी हिंदू पद्धतीने विवाह केला होता. ते फोटो देखील वानखेडे कुटुंबीयांनी जाहीर केले आहेत.

loading image
go to top