Love Jihad चे सावट! नवरात्र उत्सवातील गरब्यात आता ओळखपत्राशिवाय ‘नो एंट्री’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

garba

Love Jihad चे सावट! नवरात्र उत्सवातील गरब्यात आता ओळखपत्राशिवाय ‘नो एंट्री’

भोपाळ - मध्य प्रदेशातील गरबा प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. शिवराज सिंह चौहान सरकारमधील मंत्री उषा ठाकूर यांनी लव्ह जिहादवर वक्तव्य केले आहे. गरबा खेळला जात असलेले सभामंडप हे लव्ह जिहादचे केंद्र बनले होते, त्यामुळे आता ओळखपत्राशिवाय प्रवेश गरबा सभामंडपात प्रवेश मिळणार नसल्याचं त्यांनी म्हटले आहे. Love Jihad news in Marathi

हेही वाचा: रणनितीकार प्रशांत किशोर यांना लागले भाजपचे वेध; बड्या नेत्याचा दावा

नवरात्रीपूर्वी ग्वाल्हेरमधील संस्कृती, उषा ठाकूर यांनी इशारा दिला की, गरबा सभामंडप हे लव्ह जिहादचे मोठे माध्यम बनले आहे. आज सर्व गरबा आयोजक सतर्क आहेत. आता जो कोणी गरबा खेळण्यासाठी येईल त्याने ओळखपत्र आणावे. गरबा सभामंडपात ओळखपत्रशिवाय कोणीही नसावे. हा प्रत्येकासाठी सल्ला असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

उषा ठाकूर म्हणाल्या की, आमचे लोक आणि संबंधित संघटना जागरूक आहेत, कारण गरबा सभामंडप हे लव्ह जिहादचे मोठे माध्यम बनले होते, त्यामुळे आता कोणीही आपली ओळख लपवून गरबा सभामंडपात येऊ नये.

हेही वाचा: Cyrus Mistry: मिस्त्रींच्या अपघातानंतर लावतेय सीटबेल्ट; सुप्रिया सुळे झाल्या भावूक

नवरात्रीला लवकरच सुरुवात होणार आहे. गेल्या वर्षीही मध्य प्रदेशातील गरबा सभामंडपाबाबत विशेष मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या. अनेक ठिकाणी विहिंपने बिगर हिंदूंना प्रवेश बंदी असे बॅनर लावले होते. विहिंपशी संबंधित लोकांनी सांगितले की, जर बिगर हिंदू लोक हिंदुंच्या विधी पाळत नसतील तर त्यांनी गरबा खेळण्यासाठी येऊ नये.

Web Title: Madhya Pradesh Minister Love Jihad Remark On Garba Function

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..