रणनितीकार प्रशांत किशोर यांना लागले भाजपचे वेध; बड्या नेत्याचा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prashant Kishor targets BJP-JDU on Agnipath scheme

रणनितीकार प्रशांत किशोर यांना लागले भाजपचे वेध; बड्या नेत्याचा दावा

नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वांना एकत्र करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या दौऱ्यात त्यांनी त्यांचे जुने सहकारी प्रशांत किशोर यांच्यावरही निशाणा साधला. (Prashant Kishor news in Marathi)

हेही वाचा: रावणाची लंका जळाली, तुम्ही तर किरकोळ विषय; ‘बारामती’वरून पडळकरांची पवारांवर टीका

नितीश कुमार म्हणाले की, प्रशांत किशोर यांना बिहारच्या विकासाची कल्पना नाही. भाजपमध्ये जाण्याचे त्यांना वेध लागले असण्याची शक्यता आहे. नितीश कुमार म्हणाले की, किशोर माझ्यासोबत आले होते, नंतर मी इतर पक्षांसाठीचे काम सोडा, असा सल्ला दिला. पण हे काम ते देशभर करत आहेत. कारण हा त्यांचा व्यवसाय आहे. मात्र ते बोलतात त्यांच्या विधानाला काही अर्थ नाही. बिहारमध्येही त्यांना जे करायचे ते करू द्या, असंही नितीश कुमार म्हणाले.

2005 पासून बिहारमध्ये काय घडले याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही, असं किशोर यांनी म्हटलं होतं. त्यावर नितीश कुमार म्हणाले की, सवंग लोकप्रियतेसाठी ते काहीही निरर्थक बोलत आहेत. कदाचित भाजपमध्ये जावून त्यांना मदत करावी, असं किशोर यांना वाटत असेल, असा दावाही नितीश यांनी केला.

प्रशांत किशोर म्हणाले होते की, "महिन्यापूर्वी नितीश कुमार भाजपसोबत होते, आता ते विरोधकांना एकत्र करत आहेत. त्यामुळे त्यांची विश्वासार्हता, ती जनतेवर सोडली पाहिजे. नवा राजकीय प्रयोग नुकताच बिहारमध्ये झाला. मात्र त्याचा देशव्यापी परिणाम होईल असे वाटत नाही.

Web Title: Prashant Kishor Would Like To Join Bjp Nitish Kumar Statement

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..