
नीमच परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दर्ग्याजवळ हनुमानाची मूर्ती ठेवल्यानं तणाव; नीमचमध्ये कलम १४४ लागू
देशात सध्या जातीयवादावरून हिंसाचाराच्या घटना वाढत असल्याचे चित्र आहे. राजस्थानपासून ते मध्य प्रदेशपर्यंत अशा घटना सातत्याने समोर येत आहेत. दरम्यान, अशीच एक घटना काल मध्य प्रदेशातील नीमचमध्ये घडली आहे. सोमवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास दोन समुदायांमध्ये हिंसक संघर्ष झाला आहे. या घटनेमुळे परिसरातील वातावरणात तणाव निर्माण झाला असून प्रशासनाकडून येथे कलम 144 लावण्यात आले आहे.
या घटनेमुळे नीमच परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा हिंसाचार हनुमानाच्या मूर्ती प्रतिष्ठापणेवरुन झाला आहे. या भागात दर्ग्याजवळ हनुमानाची मुर्ती ठेवण्यात आली आल्याचा आरोप मुस्लिम समाजाकडून करण्यात आला आहे. दरम्यान, नीमच येथील जुनी कचरी परिसरात दोन समुदायांमध्ये जोरदार दगडफेक झाली आहे.
हेही वाचा: सोमय्यांच्या निशाण्यावर रश्मी ठाकरे, असली कोण, नकली कोण?
यामध्ये अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली असून जाळपोळीच्या घटनाही घडल्या आहेत. या गोंधळानंतर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निमत येथे या घटनेदरम्यान दोन्ही समुदायाचे लोक जमले होते. अचानक त्यांच्यात वादावादी सुरू झाली. त्यानंतर काही लोकांनी दगडफेक केली. सुदैवाने या दंगलीत कोणलाही दुखापत झालेली नाही.
या दंगलीला खतपाणी घातलेल्यांचा शोध व्हिडिओ फुटेजच्या मदतीने पोलिस करत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील राजगडमध्ये दोन समुदायांमध्ये हिंसाचाराची अशीच घटना घडली होती. या घटनेत मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि दगडफेक झाली होती. जिल्ह्यातील करणी गावात हाणामारीची घटना घडल्याने जमावाने गोंधळ घातला होता. येथे संतप्त लोकांनी आरोपीच्या घराला आग लावली आणि मोटारसायकलसह अनेक वाहनांचीही तोडफोड केली.
हेही वाचा: आता महाराष्ट्रातून भाजपचा राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध
Web Title: Madhya Pradesh Neemuch Violence Between Two Communities Section 144 Imposed In Area
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..