Kirit Somaiya I सोमय्यांच्या निशाण्यावर रश्मी ठाकरे, असली कोण, नकली कोण?, शेअर केली कागदपत्रे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kirit somiya

२०१९ की २०२१ च्या रश्मी ठाकरे असली? किरीट सोमय्यांचा सवाल

सोमय्यांच्या निशाण्यावर रश्मी ठाकरे, असली कोण, नकली कोण?

भाजपाचे किरीट सोमय्या यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांनी मनी लाँड्रिंग केल्याचा खळबळजनक आरोप केला होता. यानंतर पुन्हा एकदा भाजप शिवसेना असा वाद उफाळून आला होता. रश्मी ठाकरेंनी २३ मे २०१९ रोजी महाराष्ट्र सरकारला दिलेल्या पत्राचा उल्लेखही सोमय्यांनी केला होता. दरम्यान, आता मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे कोर्लईत बंगले अस्तित्वात होते याबाबतची कागदपत्रे किरीट सोमय्या यांनी ट्विटरवरून शेअर केली आहेत. यासह त्यांनी असली कोण नकली कोण असा सवालही उपस्थित केला आहे.

हेही वाचा: आता महाराष्ट्रातून भाजपचा राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध

ट्विटमध्ये किरीट सोमय्या यांनी दोन पत्रांचे फोटो शेअर केले आहेत. यात ते म्हणतात, असली नकली, 2019 मध्ये रश्मी उद्धव ठाकरे म्हणतात कोर्लई अलिबाग मध्ये 19 बंगलो अस्तित्वात होते/आहे. 2021 मध्ये रश्मी उद्धव ठाकरे म्हणतात 19 बंगलो अस्तित्वात नाही/ नव्हते. खरे कोण ! खोटे कोण ! 2019 च्या रश्मी ठाकरे असली की 2021 च्या रश्मी ठाकरे असली? असली कोण नकली कोण ? असा सवाल सोमय्यांनी केला आहे.

हेही वाचा: वडिलांनी मारलं म्हणून १३ वर्षाच्या मुलानं चिमुकलीचा घेतला जीव

सोमय्यांनी रश्मी ठाकरेंचे कोर्लईत बंगले असल्याचा आरोप करताना म्हटलं होतं की, २०२० मध्ये बंगल्यांचा कर रश्मी ठाकरेंनी भरला. २०१९ पासून त्यांनी टॅक्स भरला. बंगल्यासंदर्भात २०२१ चे पत्र आहे. त्यात रश्मी ठाकरेंनी माझ्याकडे १९ बंगले नव्हतेच, आम्ही जागा घेतली तेव्हाही बंगले नव्हते असं सांगितलं. आता यावर उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करावं. माईकवर एवढे बोलता मग हेसुद्धा सांगा की रश्मी ठाकरे खोट्या की उद्धव ठाकरे? लबाडी कोण करताय? असा सवाल सोमय्यांनी केला होता.

Web Title: Kirit Somaiya Share Documents Of Rashmi Thackeray Korlai Bungalow

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top