
मध्य प्रदेशच्या मुरैनामध्ये विषारी दारु प्यायल्याने 10 लोकांचा मृत्यू झाला आहे
भोपाळ- मध्य प्रदेशच्या मुरैनामध्ये विषारी दारु प्यायल्याने 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. मरणाऱ्यांमध्ये दोन वेग-वेगळ्या गावातील लोकांचा समावेश आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सुमावली पोलिस स्टेशन भागात पहावली गावात 3 आणि बागचीनी भागात मानपूर गावात 7 लोकांचा मृत्यू झाला आहे. विषारी दारू पिल्याने हे मृत्यू झाले आहेत. 7 लोक आजारी पडले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या या सर्व लोकांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून त्यांना ग्वालियरमध्ये पाठवण्यात आलं आहे.
घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आजारी लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले, पण त्यातील 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतदेहांना पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलं आहे. मध्य प्रदेशमध्ये विषायी दारु प्यायल्याने मृत्यू झाल्याच्या घटना याआधीही घडल्या आहेत. मागील वर्षी लॉकडाऊनच्या काळात रतलाम जिल्ह्यात अवैध विषारी दारू प्यायल्याने 8 लोकांचा मृत्यू झाला होता.