School Bus AccidentESakal
देश
School Bus Accident: स्कूल बसचा भीषण अपघात! ३० विद्यार्थी जखमी, ८ जणांची प्रकृती चिंताजनक
School Bus Accident: स्कूल बसचा भीषण अपघात झाला आहे. यात ३० हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहे. यात काहींची प्रकृती गंभीर आहे.
मध्य प्रदेशातील बैतूल येथे शुक्रवारी स्कूल बस उलटल्याने अपघात झाला. या घटनेत 30 विद्यार्थी जखमी झाले असून आठ मुलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सायखेडा येथील प्रगती हायस्कूलची स्कूल बस वाटेत पलटी झालेल्या निमनवाडा गावाजवळ हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. बोर्डेही, आमला आणि मुलताई येथील रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या असून अपघातात जखमी झालेल्या मुलांना मुलताईच्या सामुदायिक आरोग्य केंद्रात आणण्यात येत आहे. तसेच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे.

