

State Minister Convoy Vehicle And Rickshaw Accident
ESakal
Chhatarpur Accident News: मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात राज्यमंत्री दिलीप अहिरवार यांच्या ताफ्यातील एक वाहन ई-रिक्षाला धडकले. ज्यामध्ये सात जण जखमी झाले. या अपघातात एका ७० वर्षीय व्यक्तीने आपले दोन्ही पाय गमावले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात आणि नंतर ग्वाल्हेर येथे रेफर करण्यात आले. मंत्र्यांचा ताफा दसरा मेळाव्यावरून परतत होता.