भाजप नेत्याच्या घरावर धाड; 17 बॉम्बसह 116 काडतुसं जप्त

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 एप्रिल 2019

मध्यप्रदेशातील भाजप नेते संजय यादव यांच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली. यामध्ये त्यांच्या घरातून 17 देशी बॉम्ब, 13 पिस्तुल आणि 116 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

भोपाळ : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात चोख सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात येत आहे. तसेच विविध ठिकाणांवर पोलिसांकडून छापेमारीची कारवाईही केली जात आहे. त्यातच आता मध्यप्रदेशातील भाजप नेते संजय यादव यांच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली. यामध्ये त्यांच्या घरातून 17 देशी बॉम्ब, 13 पिस्तुल आणि 116 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

मध्य प्रदेश पोलिसांकडून राज्यभरात विविध ठिकाणी छापेमारीची कारवाई करण्यात येत आहे. यादरम्यान पोलिस अधीक्षक यांगचेन डी. भुटिया यांच्या पथकाला माहिती मिळाली होती. त्यानुसार, संजय यादव यांच्या घरावर धाड टाकण्यात आली. पोलिसांनी या धाडीमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी संजय यादवविरोधात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. संजय यादव यांच्यासोबत त्यांचा सहकारी गोपाळ जोशी याच्यावरही पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.  

दरम्यान, याप्रकरणातील दोन्ही आरोपी सध्या फरार असून, पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Madhya Pradesh Police Raided on BJP Leader Sanjay Yadavs House