

कायद्याने प्रौढांना त्यांच्या पसंतीनुसार लग्न करण्याचा अधिकार दिला आहे, परंतु देशाच्या अनेक भागांमध्ये, प्रेमविवाह करणाऱ्या तरुणांना आणि त्यांच्या कुटुंबांना अजूनही सामाजिक छळाला सामोरे जावे लागते. मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील पंचेवा गावात असाच एक प्रकार समोर आला आहे, या गावात प्रेमविवाह करणाऱ्या तरुण तरुणीच्या कुटुंबांवर उघडपणे सामाजिक बहिष्कार टाकण्याची घोषणा करण्यात आली आहे.