'मोदींच्या दाढीत घरंच घरं'; एकदा दाढी झाडली की, 50 लाख घरं बाहेर पडतात अन् दुसऱ्यांचा..' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi

'जेव्हा तुम्ही मोदींची दाढी पाहणं बंद कराल, तेव्हा तुम्हाला घर मिळणंही बंद होईल'

'मोदींच्या दाढीत घरंच घरं'; एकदा दाढी झाडली की, 50 लाख घरं बाहेर पडतात'

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) रीवामध्ये भाजप खासदार जनार्दन मिश्रा (BJP MP Janardan Mishra) पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळं चर्चेत आले आहेत. त्यांनी पीएम मोदींच्या (Narendra Modi) दाढीबद्दल असं काही वक्तव्य केलंय की, त्यांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. पीएम मोदींच्या दाढीत घरंच घरं आहेत, असं मिश्रांनी म्हटलंय. मोदींनी एकदा दाढी केली, की 50 लाख घरं बाहेत पडतात. त्यांचं हे बेताल वक्तव्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतंय. या व्हिडिओत पीएम मोदींच्या दाढीतून घरं निघतात, असं भाजप खासदार म्हणताना दिसताहेत.

जनार्दन मिश्रा म्हणाले, पंतप्रधान मोदींनी एकदा दाढी केली, की 50 लाख घरं बाहेर येतात. त्यांनी दुसऱ्यांदा दाढी झाडली की, एक कोटी घरं बाहेर येतात. मोदींनी प्रत्येक वेळी दाढी केल्यावर घरंच घर बाहेर पडतात, त्यामुळं प्रत्येकानं पंतप्रधानांची दाढी पाहावी. जेव्हा तुम्ही दाढी पाहणं बंद कराल, तेव्हा तुम्हाला घर मिळणंही बंद होईल, असंही ते म्हणाले.

हेही वाचा: 'शिवेंद्रराजेंसह राष्ट्रवादीचे नेतेही माझ्या पराभवाला जबाबदार'

जोपर्यंत पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर दाढी आहे, तोपर्यंत घरं मिळत राहतील. म्हणूनच, पंतप्रधानांची दाढी बघा आणि घरं मिळवा, असं आवाहनही त्यांनी केलं. जनार्दन मिश्रांनी जाहीर सभेला संबोधित करताना हे वक्तव्य केलंय. सभेत अनेक स्थानिक आमदारही उपस्थित होते. मिश्रांच्या या अजब विधानावर सेमरियाचे आमदार केपी त्रिपाठी (MLA KP Tripathi) आणि लोकांनी टाळ्या वाजवून दाद दिली. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. हा व्हिडिओ 3 नोव्हेंबरचा सेमारिया विधानसभेचा आहे. भाजप खासदार मिश्रांनी सुकुवर जायसवाली बस्तीतील रस्ता भूमिपूजन कार्यक्रमात जनतेला संबोधित केलं होतं. यावेळी त्यांनी पंतप्रधानांच्या दाढीतून घर पडत असल्याचं वक्तव्य केलं होतं.

हेही वाचा: 'उदयनराजेंना 'बिनविरोध' करता अन् माझा पराभव, मी दुधखुळा नाही'

loading image
go to top