दोन दिवसांपासून बोअरवेलमध्ये अडकलाय चिमुकला; सुटकेसाठी युद्धपातळीवर काम सुरु

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 November 2020

हे रेस्क्यू ऑपरेशन नीट पार पडावे म्हणून या घटनास्थळाच्या भागात कलम 144 लागू करण्यात आले आहे.

ग्वाल्हेर : मध्य प्रदेसातील निवाडी जिल्ह्यातील सैतपुरा गावातील एका बोरवेलमध्ये तीन वर्षांचा लहान मुलगा पडला आहे. प्रल्हाद असं या मुलाचं नाव असून त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न अद्याप सुरु आहेत. सध्या हा मुलगा बेशुद्ध अवस्थेत आहे. त्याचा आवाज येत नाहीये. तसेच आत सोडलेल्या कॅमेऱ्यामध्ये कसल्याही प्रकारची हालचाल देखील दिसत नाहीये. 

त्या मुलाला बाहेर काढण्यासाठी पोलिसांसोबतच प्रशासन व्यवस्था देखील युद्धपातळीवर कामाला लागली आहे. बुधवारी रात्री उशीरा उत्तर प्रदेशातील लखनऊमधून आलेल्या एनडीआरएफच्या टीमने हे काम हातात घेतलं आहे. पाच मशीन्स लावून खोदकाम सुरु आहे. आरोग्य विभागाच्या एका टीमद्वारे बोरवेलमध्ये सातत्याने ऑक्सीजन सोडला जात आहे. 

या घडामोडींमध्ये महत्वाची बाब अशी आहे की, रात्रीच्या अंधारातदेखील रेकॉर्ड करतील अशा क्षमतेच्या कॅमेऱ्यानी त्या बोरवेलमधील मुलावर सातत्याने नजर ठेवली जात आहे. मात्र, कॅमेऱ्यामध्ये कसल्याही प्रकारची हालचाल दिसून येत नाहीये. प्रशासनाच्या सांगण्यानुसार, बोरवेलची खोली 200 फूट खाली आहे. मात्र कॅमेऱ्यामध्ये हा मुलगा 70 फूट खोलीवर दिसून येत आहे. 

हेही वाचा - पिझ्झा खाऊन बॉक्स फेकला रस्त्यावर; 80 Km मागे येऊन उचलायला लावला कचरा

सैतपुरा गावांत राहणाऱ्या हरकिशन कुशवाहा यांनी आपल्या तीन वर्षांच्या प्रल्हादच्या सोबत आपल्या नातेवाईकांसोबत बुधवारी सकाळी नऊ वाजता शेतात पोहोचले  होते. ते काही दिवसांपूर्वीच शेतात खोदलेल्या बोरवेलमध्ये पाइप टाकण्याच्या तयारीत होते. प्रल्हाद शेतात खेळत होता. इतर लोक पाइप टाकण्याच्या तयारीत असतानाच प्रल्हाद त्या बोलवेलमध्ये पडला. गावांतील विनीता बाईंना सांगितलं की संपूर्ण गाव प्रल्हादला बोरवेलमधून लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी प्रार्थना करत आहे. मोठ्या संख्येने या घटनास्थळी लोक पोहोचले होते. ते प्रल्हादच्या सुटकेसाठी आशा धरुन आहेत. हे रेस्क्यू ऑपरेशन नीट पार पडावे म्हणून या घटनास्थळाच्या भागात कलम 144 लागू करण्यात आले आहे.

हेही वाचा - 80 पोलिसांवर कारवाई करा; विकास दुबे चकमक प्रकरणी अहवालातून एसआयटीची शिफारस

55 फूटापर्यंत खोदकाम केलं गेलं आहे. त्यानंतर जवळपास 20 फूटाचा सुरुंग बनवण्यासाठी मध्य प्रदेशातील बीना, सागर तसेच उत्तर प्रदेशातील झांसी मधून मशीन्स बोलावल्या गेल्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Madhya Pradesh to save the 3 year old boy who fell into an open borewell Rescue operation still underway