esakal | पिझ्झा खाऊन बॉक्स फेकला रस्त्यावर; 80 Km मागे येऊन उचलायला लावला कचरा
sakal

बोलून बातमी शोधा

pizza box

हायवेवरुन ड्रायव्हींग करत असताना दोन युवकांनी आपल्या कारमधून रस्त्यावर पिझ्झ्याचे रिकामे बॉक्स फेकून दिले.

पिझ्झा खाऊन बॉक्स फेकला रस्त्यावर; 80 Km मागे येऊन उचलायला लावला कचरा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कर्नाटक : बाहेर फिरायला गेलेले अनेक लोक बरीच खरेदी करतात, बाहेरचं बरंच खातात. मात्र, ते खाल्ल्यानंतर त्याचा जो काही कचरा उरतो तो तिथेच टाकून देतात. ही प्रवृत्ती सर्रास दिसून येते. आपण फिरायला ज्या भागात गेलेलो असतो, ते त्या भागाचे सौंदर्य पाहण्यासाठी... मात्र, सौंदर्य खराब करण्याचंच काम आपण एकप्रकारे अशा कृतीतून करत असतो. आणि हे उघड उघड स्पष्ट असातानाही बरेच लोक असे वर्तन सतत करताना दिसून येतात. काहीजण आपले वर्तन बदलतातही मात्र, बरेचजण पहिले पाढे पंचावन्नच वाचतात. अशीच एक घटना समोर आली आहे. ही घटना वरकरणी शुल्लक वाटते पण ती महत्वाची आहे. 

ही घटना कर्नाटकातील आहे. दोन युवकांना त्यांनी फेकलेला कचरा साफ करण्यासाठी चक्क 80 किलोमीटर परत यावं लागलं आणि केलेला कचरा साफ करावा लागला आहे. घटना अशी आहे की, हायवेवरुन ड्रायव्हींग करत असताना दोन युवकांनी आपल्या कारमधून रस्त्यावर पिझ्झ्याचे रिकामे बॉक्स फेकून दिले. या बॉक्समध्येच त्या पिझ्झ्याचं बिलदेखील  होतं. ज्यामध्ये त्या दोन्ही व्यक्तींपैकी एका व्यक्तीचा फोन नंबर होता. या नंबरवरुन पोलिसांनी त्या दोघांना फोन करुन परत बोलावून घेतलं. 

हेही वाचा - आमच्या लोकांना देशाबाहेर काढण्याची हिंमत नाही - नितीशकुमार

कोडागू टूरीझम असोशिएशनचे महासचिव मदेतिरा थिम्मैया यांनी पहिल्यांदा रस्त्याच्या कडेला पडलेला हा पिझ्झ्याचा रिकामा बॉक्स पाहिला. त्यांनी म्हटलं की, जेंव्हा मी त्या कचऱ्याला  पाहिलं तेंव्हा त्याला उघडण्याचं ठरवलं. आणि चांगली गोष्ट म्हणजे मला त्यात त्या कचरा फेकणाऱ्या युवकाचा नंबर मिळाला. मी त्याला फोन केला आणि त्यांना म्हटलं की परत या इथे आणि आपला कचरा इथून उचला. 

मात्र, असं करण्यास त्या युवकाने स्पष्टपणे नकार दिला. त्याने म्हटलं की मी कूर्गच्यादेखील पुढे  गेलेलो आहे. त्यानंतर त्या युवकाचा फोन नंबर पोलिसांना दिला गेला. आणि सोशल मीडीयावर देखील टाकला गेला. त्यानंतर त्या दोघांनाही अनेक कॉल्स येऊ लागले. त्यानंतर त्या दोघांना 80 किलोमीटर परत यावं लागलं आणि तो केलेला कचरा साफ करावा लागला. 

हेही वाचा - 80 पोलिसांवर कारवाई करा; विकास दुबे चकमक प्रकरणी अहवालातून एसआयटीची शिफारस

या घटनेमुळे कचरा करणाऱ्या लोकांना जरुर चाप बसेल, असं मत व्यक्त केलं गेलं. कचरा कचराकुंडीत टाकण्याची कृती अगदी सोपी असतानाही लोक त्यात कंटाळा करतात. त्यांच्या अशा वागण्यामुळे अनेक सौंदर्यस्थळांचे तसेच आपल्याच परिसराचे सौंदर्य नष्ट होते. या कृतीला आळा घालण्यासाठी स्वयंशिस्तीने वागण्याची गरज या घटनेतून स्पष्ट दिसून येते. 

loading image