Free Registration of 50 Lakh Rural Properties: पंतप्रधानांच्या वाढदिवशी 'स्वामित्व योजने'ने गावकऱ्यांना दिला मालकी हक्क! ५० लाख ग्रामीण संपत्तींची मोफत रजिस्ट्री

Madhya Pradesh Seva Sankalp Abhiyan,: ‘स्वामित्व योजना २०२६’मुळे ५० लाख ग्रामीण संपत्तींची नि:शुल्क नोंदणी; २३ हजार गावांमध्ये शिबिरांद्वारे मालकी हक्काचे अधिकृत दस्तऐवज वाटप
Free Registration of 50 Lakh Rural Properties

Free Registration of 50 Lakh Rural Properties

sakal

Updated on

मध्य प्रदेशात: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मध्य प्रदेशात ‘सेवा-संकल्प अभियान’ सुरू करण्यात आले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन आणि मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या उपस्थितीत इंदूरमधून या अभियानाचा शुभारंभ झाला. याच कार्यक्रमातून ‘स्वामित्व अधिकार अभिलेख निष्पादन एवं पंजीयन योजना-२०२६’ अंतर्गत राज्यातील सुमारे ५० लाख ग्रामीण संपत्तींच्या नि:शुल्क नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

अभियानाच्या शुभारंभापूर्वी नितिन नवीन आणि मुख्यमंत्री मोहन यादव यांनी इंदूरमध्ये रोड-शोही केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाबरोबरच भगवान विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com