

Madhya Pradesh Rain Tragedy Nine People Including Girl Killed After Van Swept Away While Crossing Flooded Stream
sakal
राजगड (मध्य प्रदेश) : मुसळधार पावसामुळे दुथडी भरून वाहणाऱ्या ओढ्यातून व्हॅन नेण्याचा प्रयत्न करताना ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका मुलीचा समावेश आहे. सोमवारी सकाळी सुमारे नऊ वाजता सारंगपूरजवळील पडाना बाह्यवळण पुलाजवळ ही दुर्घटना घडली. व्हॅनमध्ये ११ जण होते.