मध्यप्रदेश हिंसाचारप्रकरणी १२ जणांना अटक; ३० जणांवर गुन्हा

पोलिसांनी गुन्हा दाखल केलेले सर्वे ३० लोक मुस्लिम समाजाचे आहेत
crime  case
crime casecrime case

मध्य प्रदेश : विश्व हिंदू परिषद (Vishwa Hindu Parishad) आणि इतर सहयोगी संघटनांनी २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता गांधी नगरमधून ‘शौर्य’ यात्रा (Shaurya Yatra) काढली होती. या यात्रेत जातीय अफवांवरून मनवरच्या सिंदना रोड आणि नाला प्रांगण भागात हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी धारा पोलिसांन ३० जणांवार गुन्हा दाखल केला असून, १२ जणांना (12 people arrested) अटकही केली आहे. (Madhya Pradesh Violence)

धार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल केलेले सर्वे ३० लोक मुस्लिम समाजाचे आहेत. त्यापैकी किमान १२ जणांना अद्याप अटक करण्यात आली आहे. ज्या शहरात हिंसाचाराची घटना घडली तेथील एका मुस्लिम व्यक्तीची तीन मजली इमारत धार प्रशासनाने पाडली. धार हा सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील जिल्हा म्हणून ओळखला जातो.

crime  case
तुकाराम मुंढे येणार अडचणीत; महापालिकेवर बरखास्तीची तलवार

गांधी नगरपासून शंभर मीटर अंतरावर असलेल्या यात्रेतील लोकांमध्ये कुठूण यात्रा काढायची याबाबत चर्चा झाली होती. मार्ग आधीच ठरलेला होता. परंतु, रॅलीत नवीन आलेल्या लोकांनी अरुंद आणि गजबजलेला मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आणि आपापसात चर्चा (नवीन मार्गाबद्दल) झाली. यात्रेची सांगता होत असतानाच जातीय संघर्षांबद्दल अफवा पसरल्या. यामुळे शहराच्या दुसऱ्या भागात दगडफेक आणि काही हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या, असे धारचे पोलिस अधीक्षक आदित्य प्रताप सिंग यांनी एक वृत्तवाहिनीला सांगितले.

या प्रकरणासंदर्भात धार पोलिसांनी तीन एफआयआर नोंदवले आहेत. पहिला एफआयआर दंगल, दुसरा अश्लील शब्द वापरणे आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा आहे. पंकज कुशवाह (३६) याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने १२ लोकांना त्यांच्या घरात घुसून ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. दुसरी एफआयआर नीरज अग्रवाल यांच्या तक्रारीवरून दुकानांवर दगडफेक आणि दुकानाबाहेर उभ्या असलेल्या वाहनांचे नुकसान केल्याप्रकरणी नोंदवली आहे. तिसरा एफआयआर सरकारी अधिकाऱ्यांना कर्तव्यात असताना अडथळा आणल्याबद्दल पोलिस तक्रारीवरून दाखल करण्यात आला.

crime  case
काळा ड्रेस अन् लाल बांगड्यांमध्ये श्रद्धा आर्य दिसतेय सुंदर

२०१६ मध्येही घडली होती घटना

२०१६ मध्ये मनावर येथेही अशीच हिंसाचाराची घटना घडली होती. शौर्य यात्रेच्या (Shaurya Yatra) पार्श्वभूमीवर शहरात दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर संतप्त जमावाने दुकाने आणि बसेस जाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तेथे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कलम १४४ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com