
मध्यप्रदेशातील भिवपुरीत एका महिलेचा मृतदेह पाण्याने भरलेल्या खड्ड्यात मृतदेह आढळून आला होता. त्यामुळे हा अपघात मानला जात होता. मात्र आता महिलेच्या मृत्यूपुर्वीचा इंस्टाग्रामवरील व्हिडिओ समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बीना यादव नावाची महिला सोमवारी तिच्या माहेरातून गायब झाली आणि यानंतर तिने पती आणि सासरच्या लोकांच्या जाचाला कंटाळून जीव देत असल्याचे इंस्टाग्राम व्हिडिओद्वारे सांगितले आणि टोकाचा निर्णय घेतला. या व्हिडिओ द्वारे तिने आपला मुलगा तिच्याआईवडिलांकडे सोपविण्यास सांगितले आहे.