esakal | Gwalior: बस कंटेनरच्या धडकेत ७ जणांचा मृत्यू, १५ गंभीर
sakal

बोलून बातमी शोधा

accident

ग्वालियार : बस कंटेनरच्या धडकेत ७ जणांचा मृत्यू, १५ गंभीर

sakal_logo
By
दत्ता लवांडे

ग्वालियार : ग्वालियार मधून उत्तरप्रदेशमधील बरेली कडे जाणाऱ्या बसचा कंटेनरला धडकून भिषण अपघात झाला. यामध्ये बसमधील ७ लोकांचा मृत्यू झाला असून १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका महीलेचा सामावेश असून हा अपघात भिंड जिल्ह्यातील गोहद येथे झाला.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार मृतांपैकी ४ जणांची ओळख पटली असून यामध्ये रजत राठोड (22) पत्ता. किलागेट ग्वालियार, गानी आदिवासी (20) पत्ता सायगढ, जिल्हा सागर, हरेंद्र निवासी इटावा आणि हरिओम निवासी हरदोई, उत्तरप्रदेश हे आहेत. ३ मृतांची ओळख पटली नसून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

हेही वाचा: पुण्यात सलग ७५ तास कोरोना लसीकरण मोहिम

गोहाद पोलीस ठाण्याचे ओम प्रकाश मिश्रा यांनी सांगितले की ही घटना शुक्रवारी सकाळी साडेसात च्या सुमारास घडली. धडकेनंतर कंटेनर पलटी होऊन ड्रायव्हर गंभीर जखमी झाला तसेच अपघातानंतर बसचा ड्रायव्हर पळून गेला आहे.

सरासरी जर काढायला गेली तर 2020 साली दररोज तब्बल 328 लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (NCRB) 2020 सालच्या आपल्या वार्षिक 'क्राईम इंडिया' रिपोर्टमध्ये हा खुलासा केला आहे. या रिपोर्टनुसार, निष्काळजीपणामुळे झालेल्या रस्ते अपघातामध्ये तीन वर्षांच्या दरम्यान 3.92 लाख लोकांचा जीव गेला आहे. तर 2020 मध्ये 1.20 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 2019 मध्ये 1.36 लाख आणि 2018 मध्ये 1.35 लाख मृत्यू झाले आहेत. ही आकडेवारी खूप गंभीर असतानाही अपघाताची सरासरी कमी होताना दिसत नाही.

loading image
go to top